Talathi Bharti 2023: Online Form, Last Date; ऑनलाईन अर्ज करा!

By Admin

Published on:

Talathi Bharti 2023: Online Form, Last Date, Notification, Online Form Link for 4644 Vacancies

Maharashtra Talathi Bharti 2023: Maharashtra Revenue Department is recruiting candidates for 4644 Talathi Posts. Check the Online Application Link, Notification, Eligibility, Salary, Vacancy, Selection Procedure, Pay Scale, and Other Details.

राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. महसूल विभागात तलाठी गट ‘क’ संवर्गातील पदांसाठी मोठी भरती जाहिर केली आहे. राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या 36 जिल्ह्यांतील 4644 पदांच्या भरती जाहिरात आज (23 June 2023) शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. ऑनलाईन अर्ज 26 जून 2023 पासून सुरु होणार आहेत. तसेच 17 जुलै 2023 ही फाॅर्म भरायची शेवटची तारीख असणार आहे. अधिकृत जाहिरात महाभूलेख वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मित्रांनो, तलाठी भरती जाहिरातीच्या लिंक्स आम्ही खाली दिलेल्या आहेत. महाराष्ट्र तलाठी भरती बद्दल सतत अपडेट्स मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षा डॉट को./कॉम संकेतस्थळाला भेट देत रहा.

Talathi Bharti 2023

Maharashtra Talathi Bharti 2023: Maharashtra Revenue Department has released a notification inviting eligible candidates to 4644 vacancies through Maharashtra Talathi Recruitment 2023 on the official website at mahabhumi.gov.in. Eligible candidates who possess the required qualification can apply for the Talathi Bharti 2023 on the official website @ mahabhumi.gov.in. The direct link to Talathi Bharti Apply Online 2023 is provided below in the article. Candidates read this article for details information regarding Maharashtra Talathi Bharti Online Application Form 2023, Registration, Eligibility Criteria, Salary, Age limit, Educational Qualification, and other details read the complete article below.

Talathi Bharti Notification 2023

Maharashtra Talathi Bharti Notification for 4644 vacancies has been released on mahabhumi.gov.in on 23 June 2023. The direct link to download the detailed advertisements for Talathi Bharti has been shared below as the officials have now released the notification officially. Interested candidates must go through the Talathi Bharti Notification 2023 by clicking the below links.

Talathi Bharti Notification 2023 (तलाठी भरती जाहिरात) – Click Here

Maharashtra Talathi Bharti 2023 Details

Name of OrganizationMaharashtra Revenue Department (RFD)
Recruitment NameTalathi Recruitment 2023
Post NameTalathi
Total Vacancies4644
EligibilityGraduation
Selection ProcessWritten Exam
Pay ScaleRs. 25500/- to Rs. 81100/-
Job LocationMaharashtra
Official Websitemahabhumi.gov.in

Talathi Bharti 2023 Important Dates: तलाठी भरती महत्त्वाच्या तारखा

The detailed registration schedule has been released along with the Maharashtra Talathi Bharti Recruitment 2023 notification pdf on the official website. We provided the important dates below in the table.

तलाठी भरती 2023 संबंधित सर्व महत्त्वाच्या तारखा अधिसूचना PDF सोबत प्रसिद्ध करण्यात येणार असून तलाठी भरती 2023 परीक्षेशी संबंधित सर्व महत्त्वाच्या तारखा खाली दिल्या आहेत.

Talathi Notification Release Date23 June 2023
Talathi Bharti 2023 Registration Starts26 June 2023
Last Date to Apply17 July 2023
Talathi Admit Card 2023To be announced
Talathi Exam Date 202317 August 2023 to 12 September 2023

Talathi Bharti 2023 Vacancy: तलाठी भरती रिक्त जागा तपशील

Candidates can check the Talathi Bharti 2023 Vacancy, Division and district wise in the below table.

महाराष्ट्र तलाठी भरती 2023 साठीच्या रिक्त जागा प्रत्येक जिल्ह्याद्वारे स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्या आहेत. उमेदवार विभागानुसार आणि जिल्ह्यानुसार रिक्त जागांचा तपशील खालील तक्त्यात बघू शकतात.

अ.क्र.जिल्हारिक्त पदांची संख्या
1अहमदनगर250
2अकोला41
3अमरावती56
4औरंगाबाद161
5बीड187
6भंडारा67
7बुलढाणा49
8चंद्रपूर167
9धुळे205
10गडचिरोली158
11गोंदिया60
12हिंगोली76
13जालना118
14जळगाव208
15कोल्हापूर56
16लातूर63
17मुंबई उपनगर43
18मुंबई शहर19
19नागपूर177
20नांदेड119
21नंदुरबार54
22नाशिक268
23उस्मानाबाद110
24परभणी105
25पुणे383
26रायगड241
27रत्नागिरी185
28सांगली98
29सातारा153
30सिंधुदुर्ग143
31सोलापूर197
32ठाणे65
33वर्धा78
34वाशिम19
35यवतमाळ123
36पालघर142

Talathi Bharti 2023 Apply Online: तलाठी भरती ऑनलाईन अर्ज

The eligible candidates can apply by clicking on the direct link below which will be activated on 26th June 2023 and remain active till 17th July 2023. (ऑनलाईन अर्जाची लिंक 26 जून 2023 पासून सुरु होणार आहे.)

👉 ऑनलाईन अर्ज कराApply Online

Talathi Bharti 2023 Education Qualification: शैक्षणिक पात्रता

कोणत्याही शाखेतील पदवी, तलाठी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्था अथवा विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.

Talathi Bharti 2023 Age Limit: वयोमर्यादा

The Talathi Bharti 2023 Application Fee category-wise has been mentioned below, which has to be paid through online mode only.

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक आहे. SC/ST/PWD/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी शिथिलता देण्यात येणार आहे.

  • सर्वसाथारण प्रवर्ग: 18 ते 38
  • मागास प्रवर्ग: 18 ते 43

Talathi Bharti 2023 Application Fees: अर्ज फी

  • खुला प्रवर्ग: रु. 1000/-
  • मागासवर्गीय: रु. 900/-

Talathi Bharti 2023 Required Documents: तलाठी भरतीसाठी लागणारी कागदपत्रे

तलाठी भरती 2023 ऑनलाइन फॉर्म भरताना तुम्हाला कोणते कागदपत्रे (Talathi Bharti Document) आवश्यक आहेत हे माहित असणे आवश्यक आहे. तसेच तलाठी भरतीमध्ये निवड झाल्यानंतर दस्तऐवज पडताळणीसाठी कोणती कागदपत्रे (Talathi Bharti Document Verification 2023) आवश्यक आहेत याची माहिती घेणे आवश्यक आहे. जेणेकरून तलाठी भरती फॉर्म भरताना किंवा तलाठी निवड झाल्यानंतर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तलाठी भरती 2023 ऑनलाइन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांच्या यादी खाली दिलेली आहे.

Below you will find the List Of Documents Required for the Talathi Bharti Exam 2023.

शाळा सोडल्याचा दाखला (10 वी, 12 वी, पदवी )अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate)
10 वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेटराष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate)
12 वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेटजातीचा दाखला (Caste Certificate)
पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate)नॉन क्रिमिलियर (Non Creamy Layer Certificate)
पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्रजात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
इतर शैक्षणिक कागदपत्रे (NSS,NCC, etc)EWS प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसा)

Other Important Talathi Documents List: इतर आवश्यक कागदपत्रे

  • अपंग प्रमाणपत्र (Disability Certificate)
  • माजी सैनिक प्रमाणपत्र
  • खेळाडू प्रमाणपत्र (Sport Certificate)
  • प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
  • आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य प्रमाणपत्र

Download the List of Required document Pdf for Maharashtra Talathi Bharti 2023 by Mahsul Vibhag given below.

Talathi Bharti Required Document List (तलाठी भरतीसाठी लागणारी कागदपत्रे): Click Here

How to apply online for Talathi Bharti 2023? तलाठी भरती 2023 साठी अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज कसा करावा?

1) अधिकृत वेबसाइटला भेट द्या: महाराष्ट्र महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइट किंवा mahabhumi.gov.in वर जा.

2) अर्जाची लिंक शोधा: वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर किंवा भरती विभागात “ऑनलाइन अर्ज करा” किंवा “तलाठी भारती 2023” लिंक शोधा. किंवा खालील लिंकवर क्लिक करा. https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html

3) सूचना वाचा: अर्ज प्रक्रियेसह पुढे जाण्यापूर्वी सूचना आणि पात्रता निकष काळजीपूर्वक वाचा.

4) अर्ज भरा: अर्जाच्या लिंकवर क्लिक करा आणि आवश्यक तपशील अचूकपणे भरा, जसे की वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि संपर्क तपशील.

5) आवश्यक कागदपत्रे अपलोड करा: आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा, जसे की शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, छायाचित्र आणि जात प्रमाणपत्र इ.

6) अर्ज फी भरा: पेमेंट विभागात जा आणि नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरून तुमच्या श्रेणीसाठी निर्धारित शुल्कानुसार अर्ज फी ऑनलाइन भरा.

7) अर्ज सबमिट करा आणि सेव्ह करा: पेमेंट पूर्ण केल्यानंतर, भरलेल्या अर्जाचे पुनरावलोकन करा आणि सबमिट करा. एक प्रिंटआउट घ्या किंवा सबमिट केलेल्या अर्जाची डिजिटल प्रत भविष्यातील संदर्भासाठी जतन करा.

तलाठी भरती अभ्यासक्रम आणि मागील वर्षाच्या सर्व प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Maharashtra Talathi Syllabus 2023
Talathi Bharti Question Papers PDF

Maharashtra Talathi Bharti 2023 Latest Updates

Talathi Bharti 2023: परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट

Talathi Bharti: राज्यातील तलाठी भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. विविध जिल्ह्यातील तलाठींची एकूण 4644 रिक्त पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र शासनाकडून या भरतीसाठी 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 दरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहे.

मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार तलाठी भरतीसाठी अर्ज करु शकतात. यासोबतच मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना नोकरीत प्राधान्य मिळणार आहे. भूमी अभिलेख विभागाकडून तलाठी भरती परीक्षा घेण्यात येणार असून लवकरच त्याची लिंक खुली करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील सहा विभागाअंतर्गत येणाऱ्या 36 जिल्ह्यांतील 4644 पदांच्या भरती केली जाणार आहे. यामध्ये पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, तसेच अमरावती या विभागांचा समावेश आहे.  सर्व जिल्ह्यातील तलाठ्यांची 4644 पदे भरली जातील. यासाठी लवकरच परीक्षा घेतली जाणार आहे.

सर्वसाधारण सूचना:

एकच प्रश्नपत्रिका: महत्वाची अपडेट म्हणजे तलाठी भरती परीक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका नसेल. राज्यातील सर्व जिल्हातून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे.

टीसीएसकडून होणार परीक्षा: परीक्षेदरम्यान होणाऱ्या गैरव्यवहाराची मागील उदाहरणे पाहता महाराष्ट्र शासनाने महत्वाची पावले उचलली आहेत. त्यामुळे तलाठी भरती परीक्षा टीसीएस कंपनीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. ही परीक्षा घेण्यासाठी टीसीएस कंपनीकडून 17 ऑगस्ट किंवा 12 सप्टेंबर या दोन तारखांचे पर्याय दिले आहेत.

एकाच जिल्ह्यातून अर्ज: तलाठी भरती परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज भरल्यास ते बाद करण्यात येतील याची नोंद घ्या.

अर्ज शुल्क: तलाठी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या साधारण गटातील उमेदवारांना एक हजार, तर आरक्षित गटातील उमेदवारांना 900 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

तलाठी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना राज्य शासनाकडून वेळोवेळी जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

2 thoughts on “Talathi Bharti 2023: Online Form, Last Date; ऑनलाईन अर्ज करा!”

Leave a Comment