Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 05 जानेवारी 2023 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.
Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 05 January 2023
Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharati, and Govt Exams.
नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट को/कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.co येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.
Daily Marathi Current Affairs | 05 January 2023
1) तेजस्विनी सावंत आणि पुष्कराज इंगोले या खेळाडूंनी नुकतेच महाराष्ट्र ओपन 2023 (Maharashtra State Olympic Games 2023) मध्ये कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर : सुवर्ण
स्पष्टीकरण : कोल्हापूरची ऑलिम्पियन तेजस्विनी सावंत आणि रत्नागिरीच्या पुष्कराज इंगोले यांनी बालेवाडी स्टेडियमवर अनुक्रमे 50 मीटर रायफल प्रोन महिला आणि पुरूष नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक गेम्स 2023 मधील पहिली दोन सुवर्णपदके पटकावली.
2) 04 ते 06 जानेवारी 2023 या कालावधीत विश्व मराठी संमेलनाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे?
उत्तर : मुंबई
स्पष्टीकरण : जगातील मराठी भाषिकांना एकत्र आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन 04 ते 06 जानेवारी 2023 या कालावधीत मुंबईमध्ये विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
3) कोणता दिवस जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जातो.
उत्तर : 4 जानेवारी
स्पष्टीकरण : जागतिक ब्रेल दिन हा दिवस दरवर्षी अंध आणि दृष्टीबाधित व्यक्तींसाठी आणि त्यांच्या मानवी हक्कांची जाणीव करुन देण्यासाठी 04 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस ब्रेल लिपीचे निर्माते / जनक म्हणून ओळखले जाणारे लुईस बेल यांच्या जन्मदिमित्त् साजरा केला जातो. लुईस बेल हे एक फ्रेंच शास्त्रज्ञ, लेखक व शिक्षक होते. त्यांनी अंध व्यक्तींसाठी बोटांच्या सहाय्याने वाचनाची पध्दत, लिपि विकसित केली आहे.
4) देशातील 78 वे ग्रँडमास्टर कोण ठरले आहेत ?
उत्तर : कौस्तव चॅटर्जी (पश्चिम बंगाल)
स्पष्टीकरण : कोलकाता स्थित एकोणीस वर्षीय बुद्धिबळपटू कौस्तव चॅटर्जी भारताचा 78वा ग्रँडमास्टर बनला. ते पश्चिम बंगालचे दहावे जीएम देखील आहेत. कौस्तवने ऑक्टोबर 2021 मध्ये बांगलादेशमधील ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत पहिला GM नॉर्म मिळवला. नोव्हेंबर 2022 च्या पहिल्या आठवड्यात आशियाई चॅम्पियनशिपमध्ये त्याला त्याचा दुसरा GM नॉर्म मिळाला.
5) भारताची 7 वी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या ठिकाणादरम्यान सुरू झाली आहे?
उत्तर : हावडा ते न्यू जलपाईगुडी
स्पष्टीकरण : पश्चिम बंगालने 30 डिसेंबर रोजी पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हावडा आणि न्यू जलपाईगुडी (NJP) दरम्यानच्या सेमी-हाय-स्पीड ट्रेनला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. ही देशातील सातवी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आहे.
6) नुकतेच कोनेरू हम्पीने जागतिक बुद्धिबळ ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले.
उत्तर : रौप्यपदक
स्पष्टीकरण : माजी जागतिक जलद चॅम्पियन के. हम्पीने अल्माटी, कझाकस्तान येथे संपन्न झालेल्या जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे पहिले रौप्य पदक जिंकण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केली. हम्पीने 17व्या आणि अंतिम फेरीत चीनच्या झोंगयी टॅनचा पराभव करत रौप्यपदक जिंकले. चौथ्या मानांकित हम्पीने 12.5 गुण मिळवले, जे कझाकिस्तानच्या सुवर्णपदक विजेत्या बिबिसारा बालाबायेवापेक्षा अर्धा गुण मागे आहे. विश्वनाथन आनंद यांच्यानंतर जागतिक ब्लिट्झमध्ये पदक जिंकणारा हम्पी ही दुसरी भारतीय आहे.
7) नुकतीच 03 जानेवारी 2022 रोजी सावित्रीबाई फुले यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे.
उत्तर : 192 वी
स्पष्टीकरण : सावित्रीबाई फुले (03 जानेवारी 1831 ते 10 मार्च 1897) या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ञ व कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांनी त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी महात्मा फुले यांच्या समवेत 1848 मध्ये पुणे या ठिकाणी भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा स्थापन केली होती. यांची नुकतीच 03 जानेवारी 2022 रोजी 192 वी जयंती साजरी करण्यात आली आहे.
8) पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो कोणत्या देशाचा क्लब अल नासरं यात 2025 पर्यंत सामील झाला आहे?
उत्तर : सौदी अरेबिया
स्पष्टीकरण : जगातील दिग्गज फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डो अरेबियाचा क्लब अल-नासर एफसीमध्ये सामील झाला आहे. 37 वर्षीय रोनाल्डोने 2025 पर्यंत अल नासरसोबत करार केला आहे.
9) कोणत्या राज्यातील धर्मादम हे भारतातील पहिले पूर्ण ग्रंथालय मतदारसंघ बनले आहे?
उत्तर : केरळ
स्पष्टीकरण : केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या मतदारसंघाने नुकताच एक नवा विक्रम केला आहे. सर्व प्रभागात वाचनालय असणारा हा भारतातील एकमेव मतदारसंघ ठरला आहे. सीएम विजयन यांच्या धर्मदाम मतदारसंघाने संपूर्ण ग्रंथालय मतदारसंघाचे स्थान प्राप्त केले आहे, जे भारतातील पहिले आहे.
10) आशिया पॅसिफिक पोस्ट्ल युनियनच्या महासंचालकपदी नुकतीच खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : डॉ. विनय प्रकाश सिंह
स्पष्टीकरण : भारत जानेवारी २०२३ पासून आशियाई पॅसिफिक पोस्टल युनियनचे नेतृत्व स्वीकारणार आहे. डॉ. विनय प्रकाश सिंह भारताच्या चार वर्षांच्या कार्यकाळात युनियनच्या महासचिवपदाची जबाबदारी सांभाळतील. डॉ सिंह 4 वर्षे या पदावर राहणार आहेत. भारताकडे कोणत्याही पोस्टल संघटनेचे नेतृत्व येण्याची हि पहिलीच वेळ आहे.