Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी – 02 फेब्रुवारी 2023

By Admin

Updated on:

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 02 फेब्रुवारी 2023 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 02 February 2023

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharati, and Govt Exams.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट को/कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.co येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

Daily Marathi Current Affairs | 02 February 2023

1) NCC ची 75 यशस्वी वर्षे पूर्ण करण्यासाठी PM मोदींनी किती रुपयांचे विशेष नाणे जारी केले आहे?

उत्तर : 75

स्पष्टीकरण : नुकतेच दिल्ली येथे NCC इव्हेंटमध्ये राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (NCC) ची 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने PM मोदींनी विशेष ₹ 75 ची नाणी जारी केले. 28 जानेवारी रोजी दिल्लीतील करिअप्पा मैदानावर 75 वर्षांच्या स्मरणार्थ NCC रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत 19 परदेशातील 196 अधिकारी आणि कॅडेट्स सहभागी झाले होते.

2) सूर्याचे निरीक्षण करणाऱ्या पहिल्या भारतीय अंतराळ मोहिमेचे नाव काय आहे?

उत्तर : आदित्य-L1

स्पष्टीकरण : भारताची पहिली सौर मोहीम म्हणजेच आदित्य-L1, सूर्याचा अभ्यास करणारे अवकाशयान जून-जुलैमध्ये प्रक्षेपित केले जाईल. इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी नुकतीच ही घोषणा केली जेव्हा ISRO ला या मोहिमेशी संबंधित एक महत्त्वाचा पेलोड व्हिजिबल लाइन एमिशन कोरोनाग्राफ (VELC) प्राप्त झाला. हा पेलोड इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सने (IIA) बनवला आहे. व्हिजिबल लाइन एमिशन कोरोनाग्राफ (VELC) हे सूर्ययानचे सर्वात महत्त्वाचे आणि प्राथमिक पेलोड आहे.

3) 1960 च्या सिंधू जल करार (IWT) मध्ये सुधारणा करण्यासाठी कोणत्या देशाने पाकिस्तानला नोटीस बजावली?

उत्तर : भारत

स्पष्टीकरण : भारत सरकारनं सप्टेंबर 1960 च्या सिंधू जल करारामध्ये (IWT) सुधारणा करण्यासाठी पाकिस्तानला नुकतीच नोटीस बजावली आहे. भारतानं परस्पर मध्यस्थीचा मार्ग शोधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही, पाकिस्ताननं 2017 ते 2022 या कालावधीत कायमस्वरूपी सिंधू आयोगाच्या पाच बैठकांमध्ये या विषयावर चर्चा करण्यास नकार दिला. या कारणांमुळं आता पाकिस्तानला नोटीस बजावण्यात आल्याचं सरकारनं म्हटलंय.

4) आंध्र प्रदेशची नवीन राजधानी कोणते शहर आहे?

उत्तर : विशाखापट्टणम

स्पष्टीकरण : ‘विशाखापट्टणम’ ही आंध्र प्रदेशची नवीन राजधानी असल्याची घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी केली आहे. येत्या 3 आणि 4 मार्च रोजी आंध्र प्रदेशमध्ये जागतिक गुंतवणूक परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यासंबंधित आयोजित केलेल्या दिल्लीमधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी ही घोषणा केली.

5) कोणत्या देशाने भुवनेश्वर येथे आयोजित FIH पुरुष हॉकी विश्वचषक जिंकला आहे?

उत्तर : जर्मनी

स्पष्टीकरण : नुकत्याच भारतात पार पडलेल्या हॉकी विश्वचषकात झालेल्या अंतिम सामन्यात जर्मनीनं बेल्जियमला मात देत विश्वचषकावर नाव कोरलं आहे. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात जर्मनीनं अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये बेल्जियमला 5-4 च्या फरकाने मात दिली.


दररोज चालू घडामोडी व जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरे वाचण्यासाठी गूगलवर SpardhaPariksha.co किंवा SpardhaPariksha.com सर्च करा.

Leave a Comment