Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी – 15 जानेवारी 2023

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 15 जानेवारी 2023 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 15 January 2023

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharati, and Govt Exams.

Advertisements

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट को/कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.co येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

Daily Marathi Current Affairs | 15 January 2023

1) महाराष्ट्र केसरी 2023 ही स्पर्धा कोणी जिंकली?

उत्तर : शिवराज राक्षे

स्पष्टीकरण : पुण्यात रंगलेल्या 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पैलवान शिवराज राक्षे याने विजय मिळवत महाराष्ट्र केसरी 2023 होण्याचा मान मिळाला आहे. अंतिम सामन्यात शिवराजने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला काही मिनिटातंच थेट चितपट करत विजय मिळवला आहे.

2) महाराष्ट्रात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ केव्हा साजरा करण्यात येणार आहे?

उत्तर : 14 ते 28 जानेवारी

स्पष्टीकरण : राज्यातील सर्व स्तरांमधून राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा, तसेच मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने दि. 14 ते 28 जानेवारी दरम्यान राज्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. राज्यात मराठी भाषेचे संवर्धन, विकास व्हावा, यासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवत आहे. मराठी भाषा विभाग मराठी भाषेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था आणि व्यक्ती यांना बळ देण्यासाठी कायमच तत्पर असतो. विशेषता: मराठी भाषेचा वापर सर्वच क्षेत्रात व्हावा यासाठी मराठी भाषा विभाग सातत्याने पुढाकार घेऊन कार्यरत आहे. सन 2013 पासून दरवर्षी दि.14 ते 28 जानेवारी या कालावधीत “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा केला जातो.

3) ‘वीर गार्डियन-2023’ (Veer Guardian) हा सराव भारत आणि कोणत्या देशा दरम्यान आहे?

उत्तर : जपान

स्पष्टीकरण : देशांमधील हवाई संरक्षण सहकार्याला चालना देण्यासाठी भारत आणि जपानच्या वायुसेनेतर्फे जपानमध्ये ‘वीर गार्डियन-2023’ या संयुक्त हवाईसरावाचे आयोजन केले आहे. जपानमधील हायाकुरी या हवाईतळावर ‘वीर गार्डियन-2023’ हवाईसराव 12 ते 26 जानेवारी या कालावधीत होणार आहे. या सरावामध्ये सहभागी होणाया भारताच्या तुकडीमध्ये 4 सुखोई 30 एमकेआय, दोन सी – 17 आणि 1 आयएल – 78 हे विमान सहभागी होणार आहे. त्याचप्रमाणे जपानी वायुसेनेतर्फे प्रत्येकी 4 एफ – 2 आणि एफ – 15 विमाने सहभागी होणार आहे.

4) 11 वर्षीय फलक मुमताजने 23 व्या राष्ट्रीय स्काय चॅम्पियनशिपमध्ये (National Sqay Championship) कोणते पदक जिंकले?

उत्तर : सुवर्णपदक

स्पष्टीकरण : जम्मू-काश्मीरच्या 11 वर्षीय फलक मुमताजने राष्ट्रीय स्काय चॅम्पियनशिपमध्ये (National Sqay Championship) सुवर्णपदक जिंकले आहे. SQAY फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे आणि जम्मू आणि काश्मीर SQAY असोसिएशन द्वारे इंडोअर स्टेडियम भगवती नगर, जम्मू येथे 23 वी राष्ट्रीय स्क्वे चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती.

5) तेलंगणाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारला?

उत्तर : शांती कुमारी

स्पष्टीकरण : वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी शांती कुमारी यांनी नुकताच तेलंगणाच्या नवीन मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला.


दररोज चालू घडामोडी व जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरे वाचण्यासाठी गूगलवर SpardhaPariksha.co किंवा SpardhaPariksha.com सर्च करा.

Leave a Comment