Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी – 13 जानेवारी 2023

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 13 जानेवारी 2023 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 13 January 2023

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharati, and Govt Exams.

Advertisements

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट को/कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.co येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

Daily Marathi Current Affairs | 13 January 2023

1) दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह केव्हा साजरा करण्यात येत असतो?

उत्तर : 11 ते 17 जानेवारी

स्पष्टीकरण : दरवर्षी, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह 11 ते 17 जानेवारी या कालावधीत साजरा केला जातो. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आयोजित केलेल्या, या सप्ताहाचा उद्देश रस्ता सुरक्षेविषयी जागरूकता पसरवण्याचा आहे, जो अधिकारी तसेच सरकारसाठी एक प्रमुख चिंतेचा विषय आहे.

2) राष्ट्रीय युवा दिन कोणाच्या जयंती स्मरणार्थ साजरा केला जातो?

उत्तर : स्वामी विवेकानंद

स्पष्टीकरण : स्वामी विवेकानंदांची जयंती, म्हणजेच 12 जानेवारी हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय युवा दिन’ (National Youth Day) म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्णयानुसार 1984 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय युवा वर्ष’ म्हणून घोषित करण्यात आले होते. त्याचे महत्त्व लक्षात घेऊन, भारत सरकारने 1984 पासून, 12 जानेवारी म्हणजेच स्वामी विवेकानंद जयंती दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून देशात सर्वत्र साजरा करण्याची घोषणा केली.

3) राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?

उत्तर : 11 जानेवारी

स्पष्टीकरण : राष्ट्रीय मानवी तस्करी जागरूकता दिवस दरवर्षी 11 जानेवारी रोजी यूएस मध्ये साजरा केला जातो. हा दिवस मानवी तस्करीबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित आहे. या दिवसाचा उद्देश जगातील मानवी तस्करीशी संबंधित गुन्ह्याकडे लोकांचे लक्ष वेधून घेणे आणि मानवी तस्करी पीडित समुदाय आणि त्यांच्या कुटुंबांवर दीर्घकाळ चालणाऱ्या मानसिक त्रासाकडे लक्ष वेधणे हा आहे.

4) G20 देशांची पहिली शिक्षण कार्यगटाची बैठक कोणत्या शहरात होणार आहे?

उत्तर : चेन्नई

स्पष्टीकरण : G-20 देशांच्या पहिल्या शैक्षणिक गटाची 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान चेन्नई येथे बैठक होणार आहे. या कार्यक्रमाची तयारी पाहण्यासाठी नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली. परराष्ट्र मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, राज्य सरकार आणि आयआयटी मद्रासची टीम या बैठकीत सहभागी झाली होती.

5) मेटा ग्रुप इंडिया (Meta) ने कोणाची ग्लोबल बिझनेस संचालक म्हणून नियुक्ती केली आहे?

उत्तर : विकास पुरोहित

स्पष्टीकरण : सोशल मीडिया कंपनी मेटा (Meta) ने विकास पुरोहित यांची भारतातील जागतिक व्यापार समूहाच्या कंपनीच्या संचालकपदी नियुक्ती केली आहे. पुरोहित मेटाच्या जाहिरातदार आणि एजन्सी भागीदारांसोबत काम करण्याच्या धोरणाचे नेतृत्व करतील.

6) हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2023 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे?

उत्तर : 85 वा

स्पष्टीकरण : नुकत्याच जारी करण्यात आलेल्या हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2023 मध्ये भारत 85 व्या क्रमांकावर आहे. हेन्ली अँड पार्टनर्स, लंडनस्थित जागतिक नागरिकत्व आणि निवासी सल्लागार कंपनीने 2023 सालासाठी हेन्ली पासपोर्ट इंडेक्स जारी केला आहे. जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत जपान पहिल्या क्रमांकावर आहे.

7) सचिन तेंडुलकरच्या घरच्या मैदानावर 20 एकदिवसीय शतके ठोकण्याच्या विक्रमाची बरोबरी कोणत्या भारतीय खेळाडूने केली आहे?

उत्तर : विराट कोहली

स्पष्टीकरण : विराट कोहलीने घरच्या मैदानावर सचिन तेंडुलकरच्या 20 वनडे शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. कोहलीने मायदेशात 20 वे वनडे शतक केवळ 99 डावांमध्ये केले, तर सचिनने 160 डावांमध्ये केले.

8) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच “रेव्होल्युशनरीज- द अदर स्टोरी ऑफ हाऊ इंडिया वोन इट्स फ्रीडम” या पुस्तकाचे प्रकाशन केले. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

उत्तर : संजीव सन्याल

स्पष्टीकरण : नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते “रेव्होल्युशनरीज- द अदर स्टोरी ऑफ हाऊ इंडिया वोन इट्स फ्रीडम” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. अर्थतज्ज्ञ संजीव सन्याल यांनी हे पुस्तक लिहिले आहे. संजीव सन्याल हे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्यही आहेत. 

9) खेलो इंडिया राष्ट्रीय महिला खो-खो लीग कोणत्या राज्यात सुरू झाली?

उत्तर : पंजाब

स्पष्टीकरण : खेलो इंडिया सीनियर वुमन नॅशनल खो खो लीग 10 जानेवारी ते 13 जानेवारी दरम्यान चंदीगड विद्यापीठ, पंजाब येथे होणार आहे. ही लीग खो खो फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे आयोजित केली जात. यामध्ये एकूण 12 संघ आणि जवळपास 200 खेळाडू सहभागी होणार आहेत.

10) जयपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (JIFF) च्या 15 व्या आवृत्तीच्या उद्घाटन समारंभात जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे.

उत्तर : अपर्णा सेन

स्पष्टीकरण : जयपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 15 व्या आवृत्तीच्या उद्घाटन समारंभात ज्येष्ठ अभिनेत्री-दिग्दर्शिका अपर्णा सेन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


दररोज चालू घडामोडी व जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरे वाचण्यासाठी गूगलवर SpardhaPariksha.co किंवा SpardhaPariksha.com सर्च करा.

Leave a Comment