Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी – 12 जानेवारी 2023

By Admin

Updated on:

Advertisement

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 12 जानेवारी 2023 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 12 January 2023

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharati, and Govt Exams.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट को/कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.co येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

Daily Marathi Current Affairs | 12 January 2023

1) कोणत्या राज्य सरकारने ग्रामीण भागात लवकरच 122 नवीन खेळांची संकुल बांधले जातील अशी घोषणा केली आहे?

उत्तर : महाराष्ट्र

स्पष्टीकरण : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे की, देशातील क्रीडा पॉवर हाऊस म्हणून राज्याचा दर्जा अधिक मजबूत करण्यासाठी ग्रामीण भागात लवकरच 122 नवीन क्रीडा संकुल बांधले जातील.

2) नुकताच जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?

उत्तर : 10 जानेवारी

स्पष्टीकरण : जागतिक हिंदी दिवस दरवर्षी 10 जानेवारी रोजी साजरा केला जातो. जागरुकता निर्माण करणे तसेच जगभरात हिंदी भाषेचा प्रचार करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. Hindi: Traditional Knowledge to Artificial Intelligence’ ही जागतिक हिंदी दिवस यंदाची थीम आहे.

3) कोणत्या भारतीय गाण्याला ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार 2023’ मध्ये सर्वोत्कृष्ट गाणे या श्रेणीत पुरस्कार मिळाला.

उत्तर : ‘नाटू-नाटू’

स्पष्टीकरण : लॉस एंजिलिसमध्ये 80 वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात एस. एस. राजामौली यांच्या RRR मधील ‘नाटू-नाटू’ या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार जिंकला आहे. हॉलिवूडमधील अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणारा हा भारतातील पहिला चित्रपट ठरला आहे.

4) RRR चित्रपटातील गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेते ‘नाटू-नाटू’ गाण्याचे संगीतकार कोण आहेत?

उत्तर : एमएम कीरावनी (MM Keeravani)

स्पष्टीकरण : भारतीय चित्रपट RRR चे सुपरहिट गाणे Natu Natu ला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा इतिहास रचणारा ट्रॅक एमएम कीरावनी यांनी संगीतबद्ध केला आहे.

5) मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर : देवेन भारती

Advertisement

स्पष्टीकरण : भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलाच्या इतिहासात प्रथमच विशेष पोलीस आयुक्त पदाची निर्मिती करण्यात आली आहे.

6) कोणते राज्य देशातील पहिले संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य बनले आहे?

उत्तर : केरळ

स्पष्टीकरण : केरळ हे देशातील पहिले संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य बनले आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केरळ हे बँकिंग सेवेत पूर्णपणे डिजिटल होणारे देशातील पहिले राज्य म्हणून घोषित केले आहे.

7) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच कोणत्या राज्यात पोलो खेळाडूच्या 120 फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले?

उत्तर : मणिपूर

स्पष्टीकरण : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूरमधील इंफाळ येथील मार्जिंग पोलो कॉम्प्लेक्समध्ये पोलो खेळणाऱ्या पोलो खेळाडूच्या 120 फूट उंच पुतळ्याचे उद्घाटन केले. मणिपूर हे पोलो खेळाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. उद्घाटन समारंभात मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग हे देखील उपस्थित होते.

8) नुकत्याच झालेल्या जयपूर फिल्म फेस्ट मध्ये कोणाला जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे?

उत्तर : अपर्णा सेन

जयपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 15 व्या आवृत्तीच्या उद्घाटन समारंभात ज्येष्ठ अभिनेत्री-दिग्दर्शिका अपर्णा सेन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

9) 83 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे?

उत्तर : जयपूर

स्पष्टीकरण : 83 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे उद्घाटन 11 जानेवारी रोजी उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी केले. जयपूरमध्ये चौथ्यांदा ही परिषद आयोजित केली जात आहे.

10) 15 व्या हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?

उत्तर : भारत

स्पष्टीकरण : हॉकी विश्वचषक 2023 ची 15 वी आवृत्ती भारतात खेळवली जाणार आहे. हॉकी विश्वचषक स्पर्धेला भारतातील ओडिशा येथे 13 जानेवारी पासून सुरुवात होणार असून यात 16 संघानी सहभाग नोंदवला आहे.  विश्वचषकाचे सामने भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियम आणि राउरकेला येथील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर होणार आहेत.


दररोज चालू घडामोडी व जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरे वाचण्यासाठी गूगलवर SpardhaPariksha.co किंवा SpardhaPariksha.com सर्च करा.

Advertisement

2 thoughts on “Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी – 12 जानेवारी 2023”

  1. 💐💐स्पर्धा परीक्षा.काॅम या वेबसाईटवर अतिशय सुंदर उपयुक्त आणि फायदेशीर केलेली आहे आणि असंच करत राहो हीच सदिच्छा.🙏🙏😊

    Reply

Leave a Comment