Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी – 10 जानेवारी 2023

By Admin

Updated on:

Advertisement

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 10 जानेवारी 2023 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 10 January 2023

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharati, and Govt Exams.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट को/कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.co येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

Daily Marathi Current Affairs | 10 January 2023

1) हिंद केसरी विजेता 2023 कोण बनला आहे?

उत्तर : अभिजित कटके

स्पष्टीकरण : हैद्राबाद येथे पार पडलेल्या हिंद केसरी स्पर्धेमध्ये पुण्याच्या पैलवान अभिजीत कटकेने बाजी मारली. अभिजीतच्या विजयामुळे यंदाची मानाची हिंद केसरीची गदा महाराष्ट्राकडे आली आहे. अभिजीतने हरियाणाच्या पैलवानाला चितपट केलं. अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या अभिजीत कटकेने हरियाणाच्या सोमवीरला मात दिली. अभिजीतने सोमवीर याला 4-0 अशा फरकाने पराभूत केलं.

2) महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?

उत्तर : रोहित पवार

स्पष्टीकरण : रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या 16 सदस्याच्या कमिटीमध्ये रोहित पवारांची निवड झाली होती. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन कमिटीची बैठक नुकतीच पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर पार पडली. यावेळी आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

3) संविधान पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे?

उत्तर : राजस्थान

स्पष्टीकरण : राजस्थानमधील राजभवनात देशातील पहिले संविधान उद्यान उभारण्यात आले आहे. या उद्यानात शिल्प आणि कलाकृतींच्या माध्यमातून संपूर्ण संविधान रंजक पद्धतीने समजावून सांगण्यात आले आहे. भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या मूळ प्रतीमध्ये वापरण्यात आलेल्या कलाकृतीच्या थीमवर संपूर्ण उद्यानाची रचना करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जयपूरमध्ये या कॉन्स्टिट्यूशन पार्कचे उद्घाटन केले आहे.

4) 18 वर्षाखालील खेलो इंडिया युथ गेम्स 2022 महिला क्वालीफायर स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

उत्तर : हरियाणा

स्पष्टीकरण : हॉकी हरियाणाच्या महिला संघाने 30 डिसेंबर रोजी भुवनेश्वर येथे झालेल्या फायनलमध्ये मध्य प्रदेशचा 2-0 असा पराभव करून खेलो इंडिया युथ गेम्स 2022 महिला 18 वर्षाखालील पात्रता स्पर्धेचे विजेतेपद जिंकले.

5) कोणते राज्य हे निलगिरी तहर प्रकल्प सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे?

उत्तर : तामिळनाडू

Advertisement

स्पष्टीकरण : तामिळनाडू राज्य प्राणी असलेल्या लुप्तप्राय प्रजातींची लोकसंख्या, वितरण आणि पर्यावरणाची अधिक चांगली समज विकसित करण्याच्या उद्देशाने निलगिरी तहर प्रकल्प राबवणार आहे. निलगिरी तहर हा तामिळनाडूचा राज्य प्राणी आहे. ही प्रजाती IUCN रेड लिस्टमध्ये लुप्तप्राय म्हणून सूचीबद्ध आहे.

6) जगातील पहिले पाम लीफ हस्तलिखित संग्रहालय कोणत्या ठिकाणी सुरू झालेले आहे? 

उत्तर : केरळ

स्पष्टीकरण : केरळचे मुख्यमंत्री (CM) पिनराई विजयन यांनी केरळमधील तिरुवनंतपुरम येथील फोर्ट परिसरात नूतनीकरण केलेल्या सेंट्रल आर्काइव्हज येथे आधुनिक दृकश्राव्य तंत्रज्ञानासह पाम लीफ हस्तलिखित संग्रहालयाचे उद्घाटन केले. “जगातील पहिले पाम-लीफ हस्तलिखित म्युझियम” म्हणून प्रसिद्ध झालेले हे संग्रहालय केरळ म्युझियम ऑफ हिस्ट्री अँड हेरिटेज यांच्या संयुक्त विद्यमाने 3 कोटी रुपये खर्चून स्थापन करण्यात आले आहे.

7) नुकतीच कोणत्या व्यक्तीची बीसीसीआयच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर : चेतन शर्मा

स्पष्टीकरण : बीसीसीआयने त्यांचे संपूर्ण पॅनल बरखास्त केल्यानंतर दोन महिन्यांनी चेतन शर्मा यांची वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली. सलील अंकोला, शिव सुनार दास, सुब्रतो बॅनर्जी आणि श्रीधरन शरथ हे निवड समितीचे नवीन सदस्य आहेत.

8) तीन दिवसीय ‘ईशान्य कृषी कुंभ-2023’ कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे?

उत्तर : मेघालय

स्पष्टीकरण : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मेघालयातील उमियम येथे तीन दिवसीय ‘ईशान्य कृषी कुंभ-2023’ चे उद्घाटन केले. तीन दिवसीय ‘ईशान्य कृषी कुंभ-2023’ 5-7 जानेवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आला होता.

9) कोणता केंद्रशासित प्रदेश 31 जानेवारी रोजी पहिली G- 20 बैठकचे आयोजन करणार आहे?

उत्तर : पुद्दुचेरी

स्पष्टीकरण : पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर डॉ. तमिलिसाई सौंदर्यराजन यांनी सांगितले की, 31 जानेवारी रोजी पुद्दुचेरी येथे जी-20 ची पहिली बैठक होणार आहे.

10) कोणत्या सरकारने महसूल पोलिस यंत्रणा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे?

उत्तर : उत्तराखंड

स्पष्टीकरण : उत्तराखंड सरकारने राज्यातील महसूल पोलीस यंत्रणा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पुष्कर सिंह धामी सरकारनेही महसुली गावे नियमित पोलिसिंग व्यवस्थेखाली आणण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार उत्तराखंडमधील 1,800 महसुली गावांमधील कायदा आणि सुव्यवस्था आता राज्य पोलिस हाताळतील.


दररोज चालू घडामोडी व जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरे वाचण्यासाठी गूगलवर SpardhaPariksha.co किंवा SpardhaPariksha.com सर्च करा.

Advertisement

Leave a Comment