Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी – 01 फेब्रुवारी 2023

By Admin

Updated on:

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 01 फेब्रुवारी 2023 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 01 February 2023

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharati, and Govt Exams.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट को/कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.co येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

Daily Marathi Current Affairs | 01 February 2023

1) क्लायमेट चेंज परफॉर्मन्स निर्देशांक 2023 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे.

उत्तर : 8

स्पष्टीकरण : क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स (CCPI 2023) मध्ये भारताला G-20 देशांमध्ये सर्वोत्तम स्थान मिळाले आहे. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स (CCPI) मध्ये भारत 8 व्या क्रमांकावर आहे. सध्या सुरू असलेल्या ६३ देशांच्या क्रमवारीत भारताला हे स्थान मिळाले आहे. कमी उत्सर्जन आणि नवीकरणीय ऊर्जेचा वाढता वापर या आधारावर ही क्रमवारी देण्यात आली आहे.

2) 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला सर्वोच्च पारितोषिक मिळाले आहे?

उत्तर : उत्तराखंड

स्पष्टीकरण : 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राज्याच्या वन्यजीव आणि धार्मिक स्थळांचे प्रदर्शन करणार्‍या उत्तराखंडच्या चित्ररथाला सर्वोच्च पारितोषिक मिळाले आहे. एकूण 17 राज्यांनी चित्ररथ सादर केला होता त्यामध्ये उत्तराखंडच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक, महाराष्ट्र दुसरा आणि उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला आहे.

3) भारतीय संघाने कोणत्या देशाला हरवून पहिला अंडर-19 महिलांच्या T20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे?

उत्तर : इंग्लंड

स्पष्टीकरण : भारताच्या अंडर 19 महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच पार पडणाऱ्या अंडर-19 महिला T20 विश्वचषकावर भारतीय संघानं नाव कोरलं आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 19 वर्षांखालील महिला अंतिम सामन्यात इंग्लंडला 7 विकेट्सच्या फरकाने मात देत विश्वचषकावर भारतीय संघाचं नाव कोरलं आहे.

4) नुकताच आसिफ शेख यांना आयसीसी स्पिरिट ऑफ 2022 साठी क्रिकेट पुरस्कार मिळाला आहे, तो कोणत्या देशाचा आहे?

उत्तर : नेपाळ

स्पष्टीकरण : नेपाळचा यष्टीरक्षक आसिफ शेख याला फेब्रुवारीमध्ये ओमान चतुष्कोणीय मालिकेतील त्यांच्या T20I सामन्यात आयर्लंडच्या अँडी मॅकब्राईनला धावबाद करण्यास नकार देण्याच्या नि:स्वार्थ निर्णयामुळे त्याला 2022 चा ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

5) दिल्लीतील मुघल गार्डनचे नामकरण सरकारने काय केले आहे?

उत्तर : अमृत उद्यान

स्पष्टीकरण : राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक मुघल गार्डनचे नाव आता बदलण्यात आले आहे. मुघल गार्डनचं नाव बदलून अमृत उद्यान असं ठेवण्यात आलं आहे. देशाच्या अमृत ​​महोत्सवानिमित्त मुघल गार्डनचे नामकरण करण्यात आले आहे. हे गार्डन फुलांच्या विशेष विविधतेसाठी ओळखली जाते. हे उद्यान देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी जनतेसाठी खुलं केलं होतं.

6) नुकतेच खादी महोत्सव- 23 चे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले आहे?

उत्तर : मुंबई

स्पष्टीकरण : खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (KVIC) अध्यक्ष श्री मनोज कुमार यांच्या हस्ते महिनाभर चालणाऱ्या खादी महोत्सव- 23 चे उद्घाटन मुंबईत झाले.

7) 2022 साठीच्या ‘आईसीसी मेन्स T20 क्रिकेटर ऑफ द ईयर’ ने कोणाला सन्मानित करण्यात आले?

उत्तर : सूर्यकुमार यादव

स्पष्टीकरण : भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव याने 2022 वर्षातील T20 क्रिकेटर ऑफ द ईयर खेळाडूचा पुरस्कार पटकावला.  सूर्याकुमारने 2022 या वर्षात 31 ट्वेंटी-20 सामन्यात 46.56 च्या सरासरीने 1164 धावा केल्या आहेत.  कॅलेंडर वर्षात T20 प्रकारात 1000 धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

8) ऑगस्ट 2023 मध्ये कोणता देश 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे?

उत्तर : दक्षिण आफ्रिका

स्पष्टीकरण : दक्षिण आफ्रिकेच्या डर्बनमध्ये 15 वी ब्रिक्स शिखर परिषद यावर्षी ऑगस्टच्या अखेरीस होणार आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी 26 जानेवारी रोजी इरिट्रिया राज्याचे परराष्ट्र मंत्री उस्मान सालेह यांच्यासोबत मासावा, इरिट्रिया येथे संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली होती.

9) भारताने 12 चिते आयात करण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे?

उत्तर : दक्षिण आफ्रिका

स्पष्टीकरण : भारत आणि दक्षिण आफ्रिकेत 12 चित्ते देण्यासाठी साम्यंजस्य करार करण्यात आला आहे. त्या करारानुसार मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात फेब्रुवारी महिन्यात 12 चित्ते येणार आहेत. मागील आठवड्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेत याबाबतचा करार झाला आहे. विशेष म्हणजे मागच्या वर्षी नामिबियातून भारताने 8 चित्ते आणले आहेत. ते देखील कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले आहेत. नवी दिल्ली आणि प्रिटोरिया या दक्षिण आफ्रिकेच्या राजधानीत हा साम्यंजस्य करार करण्यात आला आहे.

10) यूएस-आधारित हिंडेनबर्ग रिसर्चने एक अहवाल प्रकाशित केला ज्यामध्ये कोणत्या भारतीय व्यवसाय गटावर स्टॉक मॅनिप्युलेशनचा आरोप आहे?

उत्तर : अदानी ग्रुप

स्पष्टीकरण : हिंडेनबर्ग रिसर्चने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात अदानी ग्रुपवर स्टॉक मॅनिप्युलेशन, टॅक्स हेव्हन्सचा अयोग्य वापर आणि मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे समूहाच्या वाढत्या कर्जाबाबतही चिंता निर्माण झाली आहे. या अहवालामुळे अदानी एंटरप्रायझेस, अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी पोर्ट्स अँड एसईझेड, अदानी ग्रीन एनर्जी आणि एनडीटीव्ही यासारख्या सूचीबद्ध कंपन्यांच्या मूल्यांकनात मोठी घसरण झाली आहे.


दररोज चालू घडामोडी व जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरे वाचण्यासाठी गूगलवर SpardhaPariksha.co किंवा SpardhaPariksha.com सर्च करा.

Leave a Comment