पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर: Maharashtra Police Bharti 2022 – 18831 Posts

By Admin

Published on:

Maharashtra Police Recruitment 2022: Apply Online for 18831 Posts @mahait.org

Maharashtra Police Bharti 2022: Maharashtra Police started the online application process and released the notification for the post of Constable on policerecruitment2022.mahait.org. The candidates can apply online on the mentioned website from 09 November 2022 to 15 December 2022. The police are filling up around 18331 vacancies for Police Constable, SRPF Police Constable and Driver Police Constable Posts. Online applying process for Maharashtra Police Constable Bharti 2022 has started from 09 November 2022. Candidates must check the complete details for Maharashtra Police Constable Recruitment 2022 which has given below.

मित्रांनो, पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती आज प्रकाशित झाल्या असून सर्व जिल्ह्यांच्या जाहिरातीच्या लिंक्स आम्ही खाली दिलेल्या आहे. पोलीस भारती बद्दल सतत अपडेट्स मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षा डॉट को./कॉम संकेतस्थळाला भेट देत रहा.

Maharashtra Police Bharti Latest Updates

 • The Online Application Deadline for Police Recruitment 2022 process has been extended by 15 days: राज्यात पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. आता अर्ज भरण्यासाठी आता 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल माहिती दिली आहे. (Police Bharti 2022 Latest Updates) आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त झाले असून राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्यातील विविध पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक कार्यालय/ राज्य राखीव दलाच्या अंतर्गत असलेल्या घटकातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील सन- 2021 पर्यंत रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदांच्या 14956 जागा, चालक पोलीस शिपाई पदांच्या 2174 जागा आणि सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या 1201 जागा असे एकूण 18331 पदे भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2022 आहे.

महाराष्ट्र पोलीस भरती: पदाचे नाव & तपशील

 • पोलीस शिपाई – 14956
 • चालक पोलीस शिपाई चालक – 2174
 • राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) – 1201

महाराष्ट्र पोलीस भरती: युनिट नुसार रिक्त जागा

युनिटपोलीस शिपाईचालक पोलीस शिपाई चालक
बृहन्मुंबई7076994
ठाणे शहर52175
पुणे शहर72010
पिंपरी चिंचवड216
मिरा भाईंदर986
नागपूर शहर308121
नवी मुंबई204
अमरावती शहर2021
सोलापूर शहर9873
लोहमार्ग मुंबई620
ठाणे ग्रामीण6848
रायगड27206
पालघर21105
सिंधुदुर्ग9922
रत्नागिरी131
नाशिक ग्रामीण16415
अहमदनगर12910
धुळे42
कोल्हापूर24
पुणे ग्रामीण57990
सातारा145
सोलापूर ग्रामीण2628
औरंगाबाद ग्रामीण39
नांदेड15530
परभणी75
हिंगोली21
नागपूर ग्रामीण13247
भंडारा6156
चंद्रपूर19481
वर्धा9036
गडचिरोली348160
गोंदिया17222
अमरावती ग्रामीण15641
अकोला32739
बुलढाणा51
यवतमाळ24458
लोहमार्ग पुणे124
लोहमार्ग औरंगाबाद108
औरंगाबाद शहर15
लातूर29
वाशिम14
लोहमार्ग नागपूर28
राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF)पद संख्या
पुणे SRPF 1119
पुणे SRPF 246
नागपूर SRPF 454
दौंड SRPF 571
धुळे SRPF 659
दौंड SRPF 7110
मुंबई SRPF 875
सोलापूर  SRPF 1033
गोंदिया SRPF 1540
कोल्हापूर SRPF 1673
काटोल नागपूर SRPF 18243
कुसडगाव अहमदनगर SRPF 19278

महाराष्ट्र पोलीस भरती: शैक्षणिक पात्रता

 • पोलीस शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.
 • पोलीस शिपाई चालक: (i) इयत्ता 12वी उत्तीर्ण.  (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV-TR)
 • राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.

महाराष्ट्र पोलीस भरती: शारीरिक पात्रता

उंची/छातीपुरुषमहिला
उंची165 सेमी पेक्षा कमी नसावी (SRPF: 168 सेमी)158 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती  न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

महाराष्ट्र पोलीस भरती: शारीरिक चाचणी

पोलीस शिपाई

क्रियापुरुषमहिलागुण
धावणी1600 मीटर800 मीटर20
100 मीटर100 मीटर15
गोळा फेक15
एकूण 50 गुण

पोलीस शिपाई चालक

क्रियापुरुषमहिलागुण
धावणी1600 मीटर800 मीटर30
गोळा फेक20
एकूण 50 गुण

पोलीस शिपाई SRPF

क्रियापुरुषमहिलागुण
धावणी05 कि.मी50
धावणी100 मीटर25
गोळा फेक25
एकूण 100 गुण

महाराष्ट्र पोलीस भरती: वयाची अट

(मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट)

 • पोलीस शिपाई: 18 ते 28 वर्षे.
 • चालक पोलीस शिपाई: 19 ते 28 वर्षे.
 • राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई: 18 ते 25 वर्षे.

परीक्षा फी:

 • खुला प्रवर्ग: रु450/-
 • मागास प्रवर्ग: रु350/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2022 15 डिसेंबर 2022

जाहिरात (Notification): Download

सर्वसाधारण सूचना: Download

अधिकृत वेबसाईट: Website

ऑनलाईन अर्ज करा: Apply Online


महाराष्ट्र पोलीस भरती: आवश्यक कागदपत्रे

 • महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार आणि सरकारी जाहीरातींमध्ये उल्लेखीत असलेली पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.
 • शाळा सोडल्याचा दाखला / १० वी चे प्रमाणपत्र.
 • जन्म दाखला.
 • 12 वी शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र गुणपत्रक.
 • अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्र.
 • संबंधित जात प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित प्रवर्गाचे विधीग्राह्य जात प्रमाणपत्र व
 • उन्नत व प्रगत गटात (नॉन क्रिमिलेयर) मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (अ.जा./अ.ज. वगळून).
 • समांतर आरक्षण (पोलीस पाल्य/माजी सैनिक/अशंकालीन/भुकंपग्रस्त/होमगार्ड / खेळाडू /
 • प्रकल्पग्रस्त / ३०% महिला आरक्षण/अनाथ इ.) मागणी केली असल्यास त्याबद्दलचे विधीग्राह्य प्रमाणपत्र.
 • आधारकार्ड (ऐच्छीक).
 • प्रमाणपत्रांच्या छाननीच्या वेळी लागू असलेल्या प्रमाणपत्रांची मूळ (Original) व सुस्पष्ट दिसतील अशा साक्षांकित केलेल्या दोन छायांकित प्रती उमेदवाराने कार्यालयास सादर करणे आवश्यक
 • उमेदवाराने प्रमाणपत्र मिळण्याकरिता सादर केलेल्या अर्जाच्या पावत्या ग्राह्य धरल्या जात नाहीत.
 • मूळ प्रमाणपत्रे उपलब्ध नसल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येऊ शकते.
 • जात वैधता प्रमाणपत्र वगळून इतर सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे ही कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक.
 • उमेदवाराने पोलीस भरतीकरिता येताना या कार्यालयाकडुन निर्गमीत केलेले पोलीस भरती प्रवेशपत्र सोबत आणने आवश्यक.
 • उमेदवाराने पोलीस भरतीकरिता येतांना त्यांनी सादर केलेल्या आवेदन अर्जाची (रजिस्ट्रेशन आयडी नमूद असलेली) प्रत प्रवेशपत्रांच्या (Admit card) २ प्रती.
 • अलिकडील काढलेले 2 पासपोर्ट साईज फोटो (आवेदन अर्ज भरतांना सादर केलेले) इत्यादी न चुकता सोबत आवश्यक.
 • मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात (Unreserved) अर्ज करु शकतात, परंतू खुल्या प्रवर्गातील (Unreserved) उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करु शकत नाहीत.
 • आवेदन अर्ज सादर करण्यापूर्वीच (संबंधीत पोलीस घटकाच्या आस्थापनेवर त्या मागास प्रवर्गासाठी पदे रिक्त असल्याबाबत खात्री करुन) त्यांनी कोणत्या प्रवर्गातून अर्ज भरावयाचा आहे हे निश्चित करावे. त्यानंतरच आवेदन अर्जात तशी माहिती नोंद करावी. संबंधित प्रवर्गाचा निर्विवाद दावा अर्ज भरताना करावा. नंतर प्रवर्ग बदलण्याबाबत उमेदवारांकडून अभिवेदन अथवा दावा / तक्रार विचारात घेतली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • कागदपत्र पडताळणीदरम्यान सादर करण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर संपूर्ण नाव, आवश्यक प्रमाणपत्राचा निर्गमित दिनांक, जात प्रमाणपत्र असल्यास जात व जातीचे वर्गीकरण [SC, ST, OBC, VJ-A (DT-A), NT-B, NT-C, NT-D, SBC & EWS] स्पष्टपणे नमूद असणे आवश्यक आहेत. (जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमेलियर प्रमाणपत्र विहित नमुन्यातील असावे.)
 • आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी मागासवर्गीय उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले स्वतंत्र जात प्रमाणपत्र व स्वतंत्र नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (अ.जा. व अ.ज. प्रवर्ग वगळून) देणे बंधनकारक आहे.
 • सदर प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर न करणाऱ्या उमेदवारास जात प्रवर्गाचा / समांतर आरक्षणाचा लाभ मिळू शकणार नाही
 • आवेदन अर्जात दावा केल्यानुसार कागदपत्रे पडताळणीच्या वेळी योग्य कागदपत्रे नसल्यास उमेदवारास गुणवत्तेनुसार सर्वसाधारण मध्ये समाविष्ट करण्यात येईल. सेवाप्रवेश नियमांमधील सर्व अर्टीची व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करणारे उमेदवार पुढील आवश्यक त्या चाचणीसाठी पात्र राहतील.
 • कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवाराने, त्यांनी ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या आवेदन अर्जाची (अॅप्लीकेशन आयडी नमूद असलेली) प्रत, पोलीस भरतीकरीता देण्यात आलेल्या शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेच्या प्रवेशपत्रांची प्रिंट व २ पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे आवश्यक आहे.

Leave a Comment