Maharashtra Police Bharti Syllabus & Exam Pattern 2022: पोलीस भरती अभ्यासक्रम मराठी

Police Bharti Syllabus

Check latest topic-wise syllabus and exam pattern in Marathi for Maharashtra Police Constable Recruitment 2022. As per Maharashtra Police Constable Bharti Notification 2022, this year, there are 18831 vacancies for this post.

Maharashtra Police Constable Syllabus & Exam Pattern 2022-2023

Maharashtra Police Constable Syllabus & Exam Pattern: नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम/को. वर आपले स्वागत आहे. नुकतीच महाराष्ट्र पोलीस भरती मंडळाने कॉन्स्टेबल भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. जर तुम्हालाही महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2022 मध्ये निवड हवी असेल, तर तुम्ही आतापासूनच परीक्षेची तयारी सुरू करू शकता. परीक्षेच्या तयारीसाठी चांगली योजना बनवण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 2022 अभ्यासक्रम (Maharashtra Police Constable Syllabus) आणि महाराष्ट्र पोलीस परीक्षा पॅटर्न 2022 (Maharashtra Police Exam Pattern) चे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. म्हणूनच या लेखात आम्ही महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल अभ्यासक्रमाशी संबंधित सर्व माहिती मराठीत दिली आहे, जी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.

Advertisements

Maharashtra Police started the online application process and released the notification for the post of Constable on policerecruitment2022.mahait.org. All the eligible candidates must apply for Maharashtra Police Constable Exam. You must also refer to Maharashtra Police Constable syllabus before starting your preparations for the exam. As per the official notification, the syllabus for Maharashtra Police Constable Exam has subjects such as General Awareness, General Marathi, Numerical & Mental Ability and Mental Aptitude /Intelligence /Reasoning. Read this article to know complete Maharashtra Police Constable Bharti syllabus and other details.

Maharashtra Police Bharti Overview 2022

Organization NameMaharashtra State Police
Post NameConstable (शिपाई), Driver (चालक)
Total Vacancy18000+
Exam LevelState Goverment
Exam DateTo be announced
Results DateTo be announced
Selection ProcessWritten and Physical Test Based
Job LocationMaharashtra, India
Official Websitemahapolice.gov.in

Maharashtra Police Bharti Syllabus & Exam Pattern

The Maharashtra Government has released the Maharashtra Police Constable Syllabus & Exam Pattern 2022on the official website. Download Maharashtra Police Constable Syllabus in PDF from the Download Link available in this article.

Maharashtra Police Bharti Exam Pattern

महाराष्ट्र पोलीस भरतीचे दोन टप्पे आहेत एक म्हणजे शारीरिक चाचणी व दुसरी लेखी परीक्षा. महाराष्ट्र पोलिस भरती 2022 साठी परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

शारीरिक चाचणी

पोलीस शिपाई :

पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालीलप्रमाणे ५० गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाते.

शारीरिक चाचणी :

पुरुष :

1600 मीटर धावणे : 20 गुण

100 मीटर धावणे : 15 गुण

गोळाफेक : 15 गुण

एकूण गुण : 50 गुण

महिला :

800 मीटर धावणे : 20 गुण

100 मीटर धावणे : 15 गुण

गोळाफेक : 15 गुण

एकूण गुण : 50 गुण

चालक पोलीस शिपाई :

चालक पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालीलप्रमाणे ५० गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाते.

पुरुष उमेदवार :

1600 मीटर धावणे : 30 गुण

गोळाफेक : 20 गुण

एकूण गुण : 50 गुण

महिला :

800 मीटर धावणे : 30 गुण

गोळाफेक : 20 गुण

एकूण गुण : 50 गुण

पोलीस शिपाई चालक पदाकरीता कौशल्य चाचणी :

शारीरिक चाचणी झाल्यानंतर शारिरीक चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना, वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे द्यावी लागेल. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल.

कौशल्य चाचणीमध्ये पुढील चाचण्यांचा समावेश असेल :

  • (अ) हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी : २५ गुण
  • (ब) जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी : २५ गुण

कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकुण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत.

लेखी चाचणी

पोलीस शिपाई पदाकरीता :

शारीरिक चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरीता बोलाविण्यास पात्र असतील.उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.

लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल:

विषयप्रश्न संख्या गुण
अंकगणित2525
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी2525
बुध्दीमत्ता चाचणी2525
मराठी व्याकरण2525

एकूण 100 गुण, परीक्षा कालावधी 90 मिनिट

चालक पोलीस शिपाई पदाकरीता :

शारीरिक चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरीता बोलाविण्यास पात्र असतील. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.

लेखी चाचणीमध्ये खालील विषयांचा समावेश असेल :

  • अंकगणित
  • सामान्यज्ञान व चालू घडामोडी
  • बुध्दीमत्ता चाचणी
  • मराठी व्याकरण आणि
  • मोटार वाहन चालविणे / वाहतुकीबाबतचे नियम

एकूण 100 गुण, परीक्षा कालावधी 90 मिनिट


Police Bharti Syllabus 2022

Below you can read or download Maharashtra Police Constable Syllabus 2022 in Marathi PDF. The Maharashtra Police Bharti Syllabus includes the following topics. महाराष्ट्र पोलिस भरती 2022 साठी परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.

विषयमहत्वाचे घटक
गणितसंख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, मसावि आणि लसावि, दशांश अपूर्णांक, वर्गमूळ घनमूळ, गुणोत्तर प्रमाण, पदावली, काळ-काम-वेग, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, नफा-तोटा, वयवारी, बेरीज, वजाबाकी, व्यवहारी अपूर्णांक, घातांक, काळ-काम-वेग, सरासरी, शेकडेवारी, भूमितीतील संकल्पना, परिमाणे.
बौद्धिक चाचणीक्रमबध्द मालिका, संख्या संचातील अंक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्यांमधील अंक शोधणे, वेन आकृती, कालमापन (दिनदर्शिका), रांगेवर आधारित प्रश्न, सांकेतिक लिपी किंवा भाषा, विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाने, आकृतीची आरशातील प्रतिमा, आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब, दिशा व अंतर, घड्याळ, नाते संबंधांची ओळख, निरीक्षण आणि आकलन.
मराठी व्याकरणमराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह, समूहदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे, ध्वनीदर्शक शब्द, प्राणी व त्यांची पिल्ले, प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीइतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक

Maharashtra Police Bharti Syllabus PDF

Maharashtra Police Bharti SyllabusDownload PDF

Hopefully, this article on Maharashtra Police Bharti Syllabus helped the aspirants understand the syllabus for this exam.

Previous articleपोलीस भरती संभाव्य प्रश्नसंच 3 : भूगोल
Next articleपोलीस भरती संभाव्य प्रश्नसंच 3 : इतिहास व समाजसुधारक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here