Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 9 Questions and Answers
We have provided Maharashtra Maharashtra State Board Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 9 (आश्वासक चित्र) that will help you solve the exercise and understand the concepts. below you will find all the questions and answers for Chapter 9.
Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 9 आश्वासक चित्र (कविता)
प्रश्न 1) कवितेच्या आधारे खालील कोष्टक पूर्ण करा.

उत्तर:
कवितेचा विषय | कवितेतील पात्र | कवितेतील मूल्य | आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी |
---|---|---|---|
स्त्री-पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र आश्वासक आहे. | मुलगा व मुलगी | स्त्री-पुरुष समानता | (१) मुलगी व मुलगा एकमेकांची कामे करतात. (२) भातुकलीतून वास्तवात येतील. (३) दोघांच्या हातात बाहुली व चेंडू असतील. |
प्रश्न 2) खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
- (१) तापलेले ऊन ………….
- (२) आश्वासक चित्र …………
उत्तर:
- (१) तापलेले ऊन – भविष्यातील धगधगते वास्तव होय.
- (२) आश्वासक चित्र – भविष्यात स्त्री-पुरुष समानता वास्तवात येईल, याचे आश्वासन होय.
प्रश्न 3) मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधा.
- (अ) ______
- (आ) ______
उत्तर:
- (अ) मी दोन्ही करू शकते एकाच वेळी
- (आ) उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत
प्रश्न 4) चौकट पूर्ण करा.
- कवयित्रीच्या मनातील आशावाद – [ ]
उत्तर:
- कवयित्रीच्या मनातील आशावाद – भविष्यात स्त्री-पुरुषांमध्ये परस्पर स्नेहभाव व सामंजस्य निर्माण होईल.
प्रश्न 5) कवितेतील खालील घटनेतून/विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा.

उत्तर:
- (अ) मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर – सहकार्य
- (आ) मी दोन्ही करू शकते एकाच वेळी – आत्मविश्वास
- (इ) जिथे खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळी – समजसपणा
प्रश्न 6) काव्यसौंदर्य.
(अ) खालील ओळींचे तुमच्या शब्दांत रसग्रहण करा.
‘भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात, हातांत हात असेल दोघांचाही’
उत्तर:
आशयसौदर्य : कवयित्री नीरजा यांनी आश्वासक चित्र या कवितेमधून स्त्री-पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र आश्वासकरीत्या कसे साकारले जाईल याची दिशा खेळणारा लहान मुलगा व मुलगी यांच्या प्रतीकांतून योग्यपणे दाखवली आहे.
काव्यसौंदर्य : भातुकलीतले जग हे स्वप्नाळू असते. त्यातला संसार हा लुटुपुटीचा असतो. मोठेपणी प्रत्यक्ष संसारातील जबाबदाऱ्या या वास्तववादी असतात, त्यामुळे भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तव प्रवेश करताना सत्य स्वीकारावे लागते, स्त्री-पुरुष यांची परस्परांना स्नेहाची साथ असेल, तर समजूतदारपणा व सहकार्याने ते जगात वावरतील, स्त्री-पुरुष परस्परांची कामे मिळून करतील, असे भविष्यकालीन आशावादी चित्र उपरोक्त ओळीतून साकारले आहे.
भाषिक वैशिष्ट्ये : या ओळींमधून लहान मुलांच्या खेळातून विचारगर्भ चिंतनाची प्रचिती येते. कवयित्रींनी साध्या विधानातून विचारगर्भ आशय थेट मांडला आहे. ‘स्त्री-पुरुष समानता’ हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय सहजपणे व्यक्त झाला आहे. भविष्यकालीन दोघांमधील सामंजस्याचे लोभस परंतु प्रगल्भ चित्र ‘हातात हात असेल’ या वाक्यखंडातून प्रत्ययकारीरीत्या प्रकट झाले आहे. स्वप्न आणि सत्य यांची योग्य सांगड तरल शब्दांत व्यक्त झाली आहे.
(आ) ‘ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील?’ या ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तर: ‘आश्वासक चित्र’ या कवितेमध्ये नीरजा यांनी आधुनिक जगातील स्त्रीचे सामर्थ्य व सहभाग यांविषयी दृढविश्वास व्यक्त करताना मुलीच्या तोंडी हे उद्गार लिहिले आहेत.
भातुकली खेळणारी मुलगी व चेंडू उडवून झेलणारा मुलगा उन्हाच्या आडोशाला खेळत आहेत, हे दृश्य कवयित्री खिडकीतून पाहत आहे. अचानक मांडीवरची बाहुली बाजूला ठेवून मुलगी चेंडू खेळणाऱ्या मुलापाशी जाते व चेंडू मागते. मुलगा तिला हिणवतो की, तू पाल्याची भाजीच कर, चेंडू उडवणे तुला जमणार नाही. तेव्हा मुलगी त्याला अत्यंत आत्मविश्वासाने म्हणते की, मी स्वयंपाक व चेंडू उडवणे हे दोन्ही एकाच वेळी करू शकते. तू माझे काम करशील का? मुलीच्या उद्गारांतून कवयित्रींनी स्त्रीचे सामर्थ्य मार्मिकपणे विशद केले आहे.
(इ) कवितेतील मुलगा आणि मुलगी कशाचे प्रतिनिधित्व करतात असे तुम्हांला वाटते, तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर: कवयित्री नीरजा यांनी स्त्री-पुरुष समानतेचे भविष्यकालीन ‘आश्वासक चित्र’ रंगवले आहे. कवितेतील मुलगा हे ‘पुरुष जातीचे प्रतीक आहे’; तर मुलगी ही ‘स्त्री जातीचे’ प्रतिनिधित्व करते. स्त्री-पुरुष समानता ही संकल्पना अजून बाल्यावस्थेत असल्यामुळे स्त्री-पुरुष तत्त्व हे मुलगी व मुलगा या लहान वयात दाखवले आहेत. उद्याच्या जगात ते दोघे प्रौढ होतील व एकत्र खेळ करतील, असा आशावाद या प्रतीकांतून कवयित्रीने व्यक्त केला आहे. स्त्री-पुरुषांमध्ये भविष्यात परस्पर सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री-पुरुष समानता नक्कीच येईल, असा दृढ विश्वास कवितेतून व्यक्त होतो.
(ई) ‘स्त्री-पुरुष समानते’बाबत तुम्हांला अपेक्षित असलेले चित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.
उत्तर: कवितेतील मुलगा व मुलगी परस्परांचे खेळ सहकार्यान खेळतात, यावरून मुलाच्या वागण्यातील बदल स्वागतार्ह आहे, हळूहळू तो आपले कसब दाखवता दाखवता घरसंसार सांभाळणे शिकेल. मोठा झाल्यावर तो स्त्रियांची कामे करील, कारण मुली पुरुषांची कामे सहजपणे करीत आहेत. स्त्री-पुरुष सहकार्याने एकमेकांची कामे करतील, हे उद्याच्या जगाचे आश्वासक चित्र असेल, दोघेही सारे खेळ एकत्र खेळतील. भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात स्त्री-पुरुषांची एकमेकांना साथ असेल, स्त्री-पुरुषांमध्ये भविष्यात सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री-पुरुष समानता नक्कीच रुजेल. असे स्त्री-पुरुष समानतेचे आश्वासक चित्र मला अपेक्षित आहे.