We have Maharashtra State Board Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 4 (उत्तमलक्षण) that will help you solve the exercise and understand the concepts.
Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 4 उत्तमलक्षण
प्रश्न 1) आकृत्या पूर्ण करा.

संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी –
- अपकीर्ती सांडावी.
- सत्कीर्ती वाढवावी.
- सत्याची वाट दृढ धरावी.

कधीही करू नयेत अशा गोष्टी –
- पुण्यमार्ग सोडू नये.
- पैज किंवा होड लावू नये.
- कुणावरही आपले ओझे लादू नये.
- असत्याचा अभिमान बाळगू नये.

गुण | दोष |
---|---|
प्रामाणिकपणा | सकाळी झोपेतून फार उशिरा उठणे. |
खेळांची आवड | मोबाईलवर वेळ वाया घालणे |
मी नियमित सूर्यनमस्कार घालतो. | मला पटकन राग येतो. |
थोरामोठ्यांचा सन्मान करतो. | खोटे बोलणे. |
प्रश्न 2) खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात.

उत्तर:
- तोंडाळ – तोंडाळासी भांडू नये.
- संत – संतसंग खंडू नये.
प्रश्न 3) खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा.
गोष्टी | दक्षता |
---|---|
(१) आळस | |
(२) परपीडा | |
(३) सत्यमार्ग |
उत्तर:
गोष्टी | दक्षता |
---|---|
(१) आळस | आळसात सुख मानू नये |
(२) परपीडा | परपीडा करू नये. |
(३) सत्यमार्ग | सत्यमार्ग सोडू नये. |
प्रश्न 4) काव्यसौंदर्य.
(अ) खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा.
‘जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये ।
पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।’
उत्तर:
आशयसौंदर्य : ‘उत्तमलक्षण’ या श्रीदासबोधातील एका समासामध्ये समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची लक्षणे सांगितली आहेत. त्यांपैकी उपरोक्त ओवीमध्ये तीन लक्षणांचा ऊहापोह केला आहे.
काव्यसौंदर्य : समाजात वावरताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात-लोकांचे मन मोडू नये. लोकांनी केलेली विनंती धुडकावू नये. उलट जनभावनांचा आदर करावा. तसेच वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये. अशी संपत्ती हे पापाचे धन असते. म्हणून सत्शील मार्गाने जीवन व्यतीत करावे. पुण्यमार्ग आचारावा. कधीही पुण्यमार्गाने जाण्याचे सोडू नये.
भाषिक वैशिष्ट्ये : वरील ओवीमध्ये जनांसाठी खूप सुगम निरूपण केले आहे. ‘तोडू नये, जोडू नये, सोडू नये’ अशा सोप्या यमकांद्वारे संदेशामध्ये आवाहकता आली आहे. ओवीछंदाला साजेशी सुबोध भाषा वापरल्यामुळे जनमानसावर तत्त्व ठसवणे सुलभ झाले आहे. पापद्रव्य व पुण्यमार्ग यांतील विरोधाभास ठळकपणे उठून दिसतो. ओवीमध्ये प्रासादिकता हा गुण आढळतो.
(आ) ‘सभेमध्यें लाजों नये। बाष्कळपणें बोलों नये।’, या ओळीतील विचार स्पष्ट करा.
उत्तर: ‘उत्तमलक्षण’ या कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श गुणसंपन्न व्यक्तीची लक्षणे समजावून सांगितली आहेत. त्यांपैकी एक लक्षण उपरोक्त चरणात सूचित केले आहे.
मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. माणसांमध्ये तो नित्य वावरत असतो. समूहामध्ये आदर्श व्यक्तीचे वर्तन कसे असावे, हे सांगताना संत रामदास म्हणतात – सभेमध्ये वावरताना, आपले मत मांडताना कधीही लाजू नये. स्पष्टपणे आपले म्हणणे मांडावे; परंतु त्याच वेळी बालिशपणे बोलून आपले हसे करून घेऊ नये. निरर्थक असे वक्तव्य करू नये. बाष्कळपणे बोलू नये. उत्तम पुरुषाचे एक मर्मग्राही लक्षण या ओवीतून मांडले आहे.
(इ) ‘आळसें सुख मानूं नये’, या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तर: ‘उत्तमलक्षण’ या ओव्यांमध्ये संत रामदास यांनी उत्तम व्यक्तीची लक्षणे विशद करताना आळस हा माणसाचा शत्रू आहे, असे ठासून प्रतिपादिले आहे.
‘आळस’ हा माणसाच्या अंगी असलेला दुर्गुण आहे. आळसामुळे कार्य करायला उत्साह राहत नाही व त्यामुळे बरीच कामे खोळंबून राहतात. ‘आळसे कार्यभाग नासतो!’ या समर्थ रामदासांच्या उक्तीमध्ये हेच तत्त्व सांगितले आहे. माणसाच्या मनाला जे षड्विकार जडतात, त्यात ‘आळस’ हा एक विकार आहे. दैनंदिन कामांमध्ये आळसाला स्थान देऊ नये. आळसामुळे प्रगती खुंटते, भविष्य अंधारते. आळसामुळे मनाला जडत्व प्राप्त होते व माणूस नाकर्ता होतो. आळशी माणसाला समाजात मान मिळत नाही. म्हणून आळसात सुख मानू नये, समाधान मानू नये, असे समर्थ रामदास सांगतात.