Maharashtra State Board Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 18 निर्णय

Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 18 Questions and Answers

In this article, you will find the Maharashtra State Board Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 18 निर्णय that will help you solve the exercise and understand the concepts.

Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 18 निर्णय

प्रश्न 1) खालील आकृती पूर्ण करा.

Advertisements

उतर:

(अ) दुकानातील रोबोची वैशिष्ट्ये :

  • १) रोबो हुबेहूब माणसासारखे दिसतात.
  • २) वागतातही मनसासारखे
  • ३) त्यांची किंमत प्रत्येकी एक लाख रुपये.
  • ४) सर्व्हिसिंगचा खर्च दर दोन महिन्यांनी अडीच रुपये.

(आ) हॉटेलमधील मनोज या वेटरच्या अंगचे गुण :

  • १) प्रमानिकपना
  • २) प्रसंगवधान

प्रश्न 2) कारणे लिहा.

(अ) हॉटेल मालकाने चार रोबो खरेदी केले, कारण _____

(आ) हॉटेल मालकाची द्‌विधा मन:स्थिती संपली, कारण _____

उतर:

  • (अ) हॉटेल मालकाने चार रोबो खरेदी केले; कारण त्याला वेटरचा प्रश्न कायमचा निकालात काढायचा होता.
  • (आ) हॉटेल मालकाची द्‌विधा मन:स्थिती संपली, कारण रोबो वेटरपेक्षा मानवी वेटर ठेवणेच श्रेयस्कर आहे, हे मालकांना पटले.

प्रश्न 3) रोबाेंना कामे करण्यासाठी सज्ज करण्याच्या कृतींच्या घटनाक्रमाचा ओघतक्ता तयार करा.

उतर:

  • (अ) चार्जिंग सुरू करणे.
  • (आ) रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत चार्जिंग चालू ठेवणे.
  • (इ) सकाळी ६ वाजता कडक इस्त्रीचे कपडे रोबोंना चढवणे.
  • (ई) डाव्या खांदयावरील पॉवर स्वीच सुरू करणे.

प्रश्न 4) खालील शब्दसमूहांचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.

उतर:

(अ) वाळवंटातील हिरवळ – वाळवंटातील रानटीपणा हे वाळवंटातील शेती क्षेत्र आहे की कोणाचीही काळजी घेतली जात नाही.

(आ) कासवगती – कासावागती हे वांझ मैदान आहे.

(इ) अचंबित नजर – चकित झालेली दृश्य म्हणजे काही दृश्य किंवा अनुभव ज्यामुळे आपण आश्चर्यचकित होऊ शकता.

(ई) द्‌विधा मन:स्थिती – दुटप्पीपणा म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती दोन पर्यायांमधील निर्णय घेऊ शकत नाही तेव्हा ती कोंडीची अवस्था म्हणूनही ओळखली जाऊ शकते.

प्रश्न 5) खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा.

उतर:

(अ) आनंद गगनात न मावणे –

अर्थ – खूप आनंद होणे.

(आ) काडीचाही त्रास न होणे –

अर्थ – अजिबात त्रास न होणे.

प्रश्न 6) शब्दसमूहांबद्दल एक शब्द लिहा.

उतर:

  • (अ) अपेक्षा नसताना – अनपेक्षित
  • (आ) ज्याचे आकलन होत नाही असे – अनाकलनीय
  • (इ) कुठलीही अपेक्षा न ठेवता – निरपेक्ष

प्रश्न 7) स्वमत.

(अ) रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

उतर: हॉटेल हेरिटेजमध्ये काम करणारे चार रोबो वेटर हे यंत्र होते. अचानक एके दिवशी त्यांच्यात बिघाड झाला आणि विचित्र पद्धतीने वागून त्यांनी मोठा गोंधळ उडवून दिला. तिथे माणसे असती तर वेगळे चित्र दिसले असते. मानवी वेटरांनी परिस्थिती बघून स्वतःहून कामात योग्य ते बदल केले असते. रोबोंसारखी विचित्र कृती नक्कीच केली नसती. दुसऱ्या प्रसंगी तर झोपलेली बाई आणि बेशुद्ध पडलेली बाई यांच्यातला फरक रोबोंना कळलाच नाही. ती बाई बेशुद्ध पडलेली आहे, हे मनोजला कळले. म्हणून योग्य ती उपाययोजना तातडीने केली गेली आणि त्या बाईचा प्राण वाचला. रोबोला स्वत:ची बुद्धी नसल्यामुळे तो स्वतंत्रपणे विचार करू शकला नाही. जिथे जिथे यंत्रमानव आहेत तिथे तिथे हेच घडणार.

(आ) ‘तंत्रज्ञान हे माणसाला पूरक आहे, पर्याय नाही’, या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.

उतर: आपण करीत असलेले काम योग्य की अयोग्य, चांगले की वाईट, हे यंत्राला ठरवता येत नाही. ते माणूसच ठरवू शकतो. कारण माणसाकडे मन, बुद्धी व भावना या गोष्टी असतात. यंत्राकडे मात्र या गोष्टी नसतात. माणूस स्वत:च्या बुद्धीने, स्वत:च्या अंत:करणाने काम करतो. यंत्र हे सांगकाम्या नोकर असते. त्याला सज्जन-दुर्जन, पापी पुण्यवान हे काहीही कळत नाही. म्हणून यंत्र कधीच मानवाची जागा घेऊ शकत नाही. कामे त्वरेने, अचूक व सफाईदारपणे करण्यासाठी यंत्र मदत करते; म्हणजे ते माणसाला पूरक आहे. ते माणसाला पर्याय ठरू शकत नाही.

(इ) ‘माणसुकीमुळेच माणूस श्रेष्ठ ठरतो’, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.

उतर: हॉटेल हेरिटेजमध्ये घडलेल्या प्रसंगातून आपल्याला खूप मोलाचा संदेश मिळतो, या हॉटेलमध्ये रोबो वेटर ठेवल्यामुळे खूप फायदा झाला. वेटरसंबंधातल्या समस्या दूर करता आल्या, यात शंका नाही. पण कोणत्याही मानवी व्यवहारांमध्ये एवढे पुरेसे नसते. माणसांशी माणसासारखे वागण्याला खूप महत्त्व असते. असे वागता येण्यासाठी प्रथम आपल्या मनात माणुसकी असावी लागते. रोबो यांत्रिकपणे निर्णय घेतात. एक गोष्ट येथे लक्षात घेतली पाहिजे की, कोणत्याही घटनेने माणसांच्या जीवनात भावनिक व वैचारिक वादळे निर्माण होतात. हा परिणाम प्रत्येकाला ओळखता आला पाहिजे. हे फक्त मानवी मनालाच शक्य आहे. माणसाकडेच माणुसकी असते. सर्व प्राण्यांमध्ये माणूस श्रेष्ठ ठरला, याचे कारण माणसाकडे असलेली माणुसकी होय.

भाषाभ्यास

खालील कृती सोडवा.

(अ)

उतर:

(१) वरील उदाहरणातील अलंकार – चेतनागुणोक्ती

चेतनागुणोक्ती अलंकाराची वैशिष्ट्ये –

  • (१) निर्जीव वस्तूवर सजीव मानवी भावनांचे आरोपण करणे.
  • (२) वसंत ऋतुला फेरीवाला असे संबोधित आहे.

(आ)

उतर:

(१) संत तुकाराम महाराजांनी वरील अभंगात ज्या दोन गोष्टींची तुलना केली आहे त्या गोष्टी – मुंगी, ऐरावत नावाचा हत्ती

(२) वरील उदाहरणातील अलंकार – दृष्टान्त

(३) दृष्टान्त अलंकाराची वैशिष्ट्ये –

  • (i) नम्रता या गुणाची महती सांगितली आहे.
  • (ii) एखादा विचार पटवून देताना त्याच अर्थाची समर्पक उदाहरणे दिली आहेत 

(इ)

उतर:

  1. वरील उदाहरणातील उपमेये – संसार, जीवन
  2. वरील उदाहरणातील उपमाने – संसार, नौका
  3. वरील उदाहरणातील अलंकार – रूपक

(ई)

उतर:

उपमेय उपमानअलंकाराचे नाव अलंकाराची वैशिष्ट्ये
सावळा 
रामचंद्र
चंद्रव्यतिरेकउपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते.

Leave a Comment