Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 17 Questions and Answers
We have provided Maharashtra State Board Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 17 सोनाली that will help you solve the exercise and understand the concepts. Below you will find all the questions and answers for Chapter 17.
Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 17 सोनाली
प्रश्न 1) आकृत्या पूर्ण करा.

उत्तर:
लेखकाने निवडलेल्या पिलाची वैशिष्ट्ये :
- (१) जन्म होऊन दोन महिने झाले होते
- (२) इतर पिल्लांपेक्षा सशक्त
- (३) कमी फिसकारणारे व शांत स्वभावाचे

उत्तर:
सोनाली आणि रूपाली यांची झोपण्यापूर्वीची दंगामस्ती :
- (१) दोघीही बिछान्यात चक्क नाचत, कुदत.
- (२) थकल्यावर झोपण्यासाठी आपापली जागा पकडत.
- (३) रूपाली ‘फुल्ल’ करून अंग टाकी व झोपी जाई.
- (४) सोनालीला लगेच झोप येत नसे. तिला लहान मुलासारखे थोपटावे लागे. मगच ती झोपी जाई.
प्रश्न 2) तुलना करा.

उत्तर:
सोनाली | रूपाली |
---|---|
रूपालीपेक्षा ७ दिवसांनी लहान. दिसायला लहानखुरी. | वयाने सोनालीपेक्षा मोठी, सुरुवातीला अंगापिंडाने सुद्धा मोठी. |
रूपाली गुरगुरली की सोनाली बापडी होऊन कोपऱ्यात बसे. | सोनालीवर ताईगिरी करायची. सोनालीवर गुरगुरायची. तिला दमात घ्यायची. |
वय वाढल्यावर रूपालीच्या दुप्पट-चौपट वाढली. | वय वाढल्यावर लहानखुरीच राहिली. |
रूपालीला सहज तोंडात उचलून धरी. पण रूपालीला तिचे दात लागत नसत. | रूपालीने तरीही आपला ताईपणा सोडला नाही. गुरगुरून सोनालीला दटावीत असे. |
प्रश्न 3) खालील वाक्यांतून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा.

उत्तर:
- (अ) सोनालीचे दात कधी रूपालीला लागले नाहीत – सोनाली प्रेमळ होती.
- (आ) रूपाली सोबत नसली तर सोनाली जाळीच्या दारावर पंजे मारी – सोनाली रुपालीवर जिवलग मैत्रिणीसारखे प्रेम करीत होती.
- (इ) सोनालीने एक मोठ्ठी डरकाळी फोडली – जेवणाच्या वेळी फसवले तर सोनालीला खूप राग येत असे.
- (ई) सोनाली शांत होऊन लेखकाचे पाय चाटू लागली – झालेल्या चुकीबद्दल माफी मागण्याची सोनालीची वृत्ती होती.
- (उ) मोठ्ठ्याने फिस्कारून सोनाली गृहस्थाच्या अंगावर आली – आपल्या जवळच्या माणसाच्या सरंक्षणासाठी धावते.
- (ऊ) सोनाली आळीपाळीने आमच्याकडे पाहत होती – आपल्या माणसांपासून आपण दूर जात आहोत, याचे सोनालीला दुःख होते.
प्रश्न 4) पुढील घटना केव्हा घडल्या ते लिहा.

उत्तर:
घटना | घटना केव्हा घडली |
---|---|
(अ) सोनाली अण्णांवर रागावली. | (१) जेवणाचा डबा न घेताच अण्णा गच्चीत सोनालीकडे गेले, तेव्हा. |
(आ) सोनालीने पातेल्याची चाळणी केली. | (२) सोनालीला दूध प्यायला दिलेले पातेले लेखक परत आणायला विसरले, तेव्हा. |
(इ) सोनाली गृहस्थाच्या अंगावर धावली. | (३) त्या गृहस्थांनी दीपालीला उचलून घेतले, तेव्हा. |
(ई) सोनाली बिथरली, गरागरा फिरू लागली. | (४) ती एकटीच पिंजऱ्यात अडकून पडली, तेव्हा. |
प्रश्न 5) सोनाली आणि रूपाली यांच्यातील मैत्री दर्शवणाऱ्या त्यांच्या दोन सवयी लिहा.
उत्तर: सोनाली आणि रूपाली यांच्यातील मैत्री दर्शवणाऱ्या त्यांच्या दोन सवयी
- (१) सोनाली व रूपाली एकत्र फिरत, एकत्र झोपत.
- (२) एकत्र जेवण घेत.
प्रश्न 6) खालील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा.
(अ) डोळे विस्फारून बघणे-
उत्तर:
- अर्थ – डोळे मोठे करून आश्चर्याने बघणे.
- वाक्य – भर उन्हात पावसाची सर आली, तेव्हा रमेश त्या दृश्याकडे डोळे विस्फारून बघू लागला.
(आ) लळा लागणे-
उत्तर:
- अर्थ – प्रेम वाटणे, माया लावणे.
- वाक्य – सखू मावशीने त्या अनाथ मुलाला भारी लळा लावला.
(इ) तुटून पडणे-
उत्तर:
- अर्थ – त्वेषाने हल्ला करणे.
- वाक्य – त्या अनोळखी कुत्र्यावर गल्लीतील कुत्री तुटून पडली.
(ई) तावडीत सापडणे-
उत्तर:
- अर्थ – कचाट्यात पडणे.
- वाक्य – दूध चोरून पिणारा बोका एकदा आईच्या तावडीत सापडला.
प्रश्न 7) स्वमत.
(अ) सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर: एकदा दीपाली सोनालीबरोबर खेळत बसली होती. तेवढ्यात एक पेशन्ट तिथे आला. त्याला ते दृश्य पाहून धक्काच बसला. दीपाली चुकून सिंहिणीकडे गेली असावी, या कल्पनेने तो धावला आणि त्याने दीपालीला चटकन उचलून घेतले. एक परका माणूस प्रिय व्यक्तीला उचलून घेतो याचा सोनालीला संताप आला. ती त्याच्यावर फिसकारली आणि चवताळून त्याच्यावर लावली. तिचा तो अवतार पाहून त्याने दीपालीला तशीच टाकली. तेवढ्यात अण्णा बाहेर आले. त्यांना घडलेली हकिकत समजली. तो प्रसंग प्रत्यक्ष पाहण्यासाठी अण्णांनी त्या गृहस्थाला दीपालीला उचलायला सांगितले. त्या गृहस्थाने दीपालीला हात लावला, मात्र सोनाली चवताळून त्याच्या अंगावर धावली. लेखकांचे घर हे आता तिला स्वतःचे घर वाटत होते. घरातली माणसे ही आता तिची माणसे झाली होती. परक्या माणसांनी घरातल्या माणसांना हातसुद्धा लावणे तिला मंजूर नव्हते. सोनालीच्या मनातली प्रेमाची ही उत्कट भावना या प्रसंगातून व्यक्त होते.
(आ) ‘पशुंना कोणी फसवलं, तर त्यांना राग येतो’, यासंबंधी तुम्ही अनुभवलेली एखादी घटना तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तर: आम्ही एकदा पारंब्यांना लोंबकळत खेळत होतो. निरंजनने बिस्किटे आणली होती. ती आम्ही वरच्या वर एकमेकांकडे फेकत आणि झेलत होतो. झोके घेता घेता झेल घेणे खूप कौशल्याचे होते. आम्ही बिस्किटे खात होतो. एखादे खाली पडत होते. आमच्या सोबत कुत्रा ते पडलेले बिस्कीट खाई. ते पाहून निरंजनला लहर आली. तो खाली उतरला. त्याने एक बिस्कीट दूर फेकले. दूरवर जाऊन त्या कुत्र्याने ते खाल्ले. नंतर नंतर निरंजन बिस्किटे फेकण्याची बतावणी करू लागला. बिचारा कुत्रा धावत जाई पण त्याला काही मिळत नसे. तो रागाने गुरगुर करीत होता. निरंजनने पातळसा दगड घेऊन बिस्कीट म्हणून फेकला. कुत्रा मोठ्या आशेने तिकडे धावला. पण बिस्कीट नाही, हे कळताच तो चवताळला. संतापाने निरंजनकडे धावला. निरंजन घाबरून पारंबीवर चढला. सरसर वर चढू लागला. चवताळलेला कुत्रा तिथे आलाच. त्याने झेप घेतली आणि निरंजनला पकडले. पण निरंजनची पॅन्ट फक्त त्याच्या तोंडात आली. पॅन्ट टर्र्र करून फाटली. आम्ही सगळे स्तब्ध होऊन बघतच राहिलो.
भाषाभ्यास
द्वंद्व समास
खालील वाक्येवाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा.

उत्तर:
- (अ) ती दोघे बहीणभाऊ आहेत – बहीणभाऊ
- (आ) खरेखोटे समजल्याशिवाय अभिप्राय देऊ नये – खरेखोटे
- (इ) कष्टाची मीठभाकर आयत्या पक्वानापेक्षा गोड लागते – मीठभाकर
खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा.

उत्तर:
- नाकडोळे – नाक आणि डोळे
- सुंठसाखर – सुंठ आणि साखर
- कृष्णार्जुन – कृष्ण आणि अर्जुन
- विटीदांडू – विटी आणि दांडू
खालील वाक्ये वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा.

उत्तर:
- कुठलीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी सत्यासत्याचा विचार करावा – सत्यासत्य
- सभेला चारपाच माणसेच उपस्थित होती – चारपाच
खालील वाक्ये वाचा व त्यातील सामासिक शब्द ओळखा.

उत्तर:
- कोपऱ्यावरच्या मंडईत भाजीपाला चांगला मिळतो – भाजीपाला
- गरिबास कपडालत्ता द्यावा, अन्नपाणी द्यावे – कपडालत्ता, अन्नपाणी
तक्ता पूर्ण करा.

उत्तर:
सामासिक शब्द | विग्रह | समासाचे नाव |
---|---|---|
पालापाचोळा | पाला, पाचोळा वैगेरे | समाहार द्वंद्व |
केरकचरा | केर, कचरा वैगेरे | समाहार द्वंद्व |
तीनचार | तीन किंवा चार | वैकल्पिक द्वंद्व |
खरेखोटे | खरे किंवा खोटे | वैकल्पिक द्वंद्व |
कुलूपकिल्ली | कुलूप किंवा किल्ली | इतरेतर द्वंद्व |
स्त्रीपुरुष | स्त्री किंवा पुरुष | इतरेतर द्वंद्व |