Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 14 Questions and Answers
We have provided Maharashtra State Board Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 14 काळे केस that will help you solve the exercise and understand the concepts. below you will find all the questions and answers for Chapter 14.
Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 14 काळे केस
प्रश्न 1) आकृत्या पूर्ण करा.

उत्तर:
तिसऱ्या मजल्यावरून पावसाळ्यात लेखकाला दिसलेली दृश्ये :
- भिंतीच्या व कौलारांच्या उंचसखल व उभ्याआडव्या रांगा समोर दिसतात.
- पावसाळ्यात दिशा धूसर बनतात.
- कधी कधी पाऊस रिमझिमतो.
- कधी कधी पाऊस धोधो कोसळतो.

उत्तर:
लेखक सर्वकाळ विचार करताना शोध घेणाऱ्या गोष्टी :
- नव्या नव्या कल्पना
- अर्धवट सुचलेल्या कल्पनांच्या आकृती पूर्ण करण्यासाठी आवश्यक शब्द
प्रश्न 2) कारणे शोधा.
(अ) लेखकाला स्वत:च्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही, कारण ______
(आ) लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावत होता, कारण ______
उत्तर:
(अ) लेखकांना स्वत:च्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही; कारण लेखकांचे केस काळे होते आणि प्रश्न विचारणाऱ्याचे केस पांढरे झाले होते, हे लेखकांच्या लक्षात आले.
(आ) लेखकांच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नांचा तगादा लावत होता; कारण तो माणूस स्वत:च्या केसांचा पांढरेपणा लपवण्यात अयशस्वी ठरत होता आणि लेखकांकडून केसांचा पांढरेपणा लपवण्याची युक्ती मिळत असल्यास हवी होती.
प्रश्न 3) खालील शब्दसूमहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

उत्तर:
अ) केसभर विषयांतर – अगदी थोडेसुद्धा विषयांतर.
आ) केसांत पांढरं पडण्याची लागण – केस पांढरे होणे
इ) प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड – कलप लावल्यामुळे पिकलेल्या केसांचा पांढरेपणा दयनीय दिसतो.
प्रश्न 4) खालील वाक्प्रचारांचे अर्थ लिहून तक्ता पूर्ण करा.

उत्तर:
वाक्प्रचार | अर्थ |
---|---|
(अ) गुडघे टेकणे. | शरण येणे. |
(आ) खनपटीला बसणे. | सारखे विचारत राहणे. |
(इ) तगादा लावणे. | पुन्हा पुन्हा विचारणे. |
(ई) निकाल लावणे. | संपवणे. |
(उ) पिच्छा पुरवणे. | एखाद्या गोष्टीचा सतत आग्रह धरणे. |
प्रश्न 5) खालील शब्दांचा वापर करून वाक्ये तयार करा.
निष्णात, झिलई, नित्यनेम, लहरी, तगादा
उत्तर:
- निष्णात – माधुरी सतार वाजवण्यात निष्णात आहे.
- झिलई – झिलई दिली की जुनी भांडी चकाकतात.
- नित्यनेम – मधू नित्यनेमाने व्यायाम करतो.
- लहरी – आपण कधी लहरी वागू नये.
- तगादा – ‘खाऊ दे’ असा छोट्या मनूने आईकडे तगादा लावला.
प्रश्न 6) खालील वाक्यांतील अलंकार ओळखा.
(अ) नव्या कल्पना कारंजाच्या तुषारांप्रमाणे उडू लागतात.
अलंकार – उपमा अलंकार
(आ) तो देखावा मुक्या शब्दांनी बोलतो.
अलंकार – चेतनगुणोक्ती अलंकार.
(इ) कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी असते.
अलंकार – उपमा अलंकार
प्रश्न 7) खालील वाक्यांतील परस्परविरोधी शब्दांचे शब्दसौंदर्य अनुभवा आणि त्याचा आस्वाद घ्या. अशा वाक्यरचना करण्याचा प्रयत्न करा.

उत्तर:
(अ) सुख – दुःख
(आ) गर्भित – उघड
(इ) स्तुती – निंदा
(ई) प्रश्न – उत्तर
परस्परविरोधी शब्द असलेल्या आणखी वाक्यरचना :
(अ) परीक्षेत मुलं पास-नापास होणारच.
(आ) खेळात हार-जीत आलीच.
(इ) मोठी मुलं लहान मुलांना समजावून सांगत होती.
प्रश्न 8) विरुद्धार्थी शब्द लिहा.
(अ) अवरोह x आरोह
(आ) अल्पायुषी x दीर्घायुषी
(इ) सजातीय x विजातीय
(ई) दुमत x संमत
(उ) नापीक x सुपीक
प्रश्न 9) स्वमत
(अ) लेखकाने खनपटीला बसलेल्या माणसाशी कलप लावण्याबाबत केलेल्या विनोदी चर्चेबाबत तुमचे मत लिहा.
उत्तर: खनपटीला बसलेल्या गृहस्थाशी लेखकांनी त्याची थट्टा करीत केसांच्या रंगाबद्दल चर्चा केली. या चर्चेमुळे माझे एक ठाम मत झाले आहे. लोक आपले वय लपवण्यासाठी, आपण म्हातारे झालेलो नाही, आपण अजूनही तरुणच आहोत, हे दाखवण्यासाठी केसांना कलप लावतात.
वास्तविक, दिवसागणिक आपले वय वाढत जाणारच. वाढत्या वयाचा आपल्या शरीरावर परिणाम होणारच. हे सर्व माणसे कधीही टाळू शकत नाहीत. माणूस निसर्गाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन माणसाने एखादया क्षेत्रात आपले नाव प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याची सुरुवात शालेय जीवनापासूनच केली पाहिजे. आपली आवडनिवड बारकाईने तपासून पाहिली पाहिजे. आपली कुवत काय आहे, आपल्याला कोणती गोष्ट झेपू शकते, आपण कशात प्रगती करू शकतो, याचा शोध घ्यायला सुरुवात केली पाहिजे. त्यानुसार आपले ध्येय ठरवले पाहिजे. तरच त्या क्षेत्रात आपल्याला आपले नाव कमावणे शक्य होईल. मग वय वाढण्याचे दुःख होणार नाही. उलट, आपल्या कर्तबगारीमुळे लोक आपल्याला तरुण समजत राहतील.
(आ) परगावी गेल्यानंतर लेखकाला आलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर: लेखक व्याख्यानांच्या निमित्ताने नेहमी परगावी जायचे. तिथे गेल्यावर जुन्या परिचयाचे, लहानपणी वर्गात असलेले, त्यांच्याशी खेळले-बागडलेले लोक भेटायचे.
जुनी माणसे भेटली की विचारपूस केली जायची. कोण कोण काय काय करतो ही माहिती दिली-घेतली जायची. लेखकांकडे आकर्षक बाब होती. त्यांचे केस अजूनही काळे होते. समोरची माणसे केसांच्या या काळेपणावरून त्यांना प्रश्न विचारत. त्यात वय जाणून घेण्यापेक्षा एक वेगळाच हेतू असायचा. बरेच जण केस काळे करण्यासाठी कलप लावतात. पण हा प्रयत्न नेहमीच अपयशी ठरतो. कलपामुळे रूप अगदी केविलवाणे बनते. लेखकांच्या एका स्नेह्याची अशी स्थिती झाली होती. त्यामुळे, लेखकांनी केस काळे राखण्यासाठी कोणती युक्ती केली असावी, याचे त्या गृहस्थाला अमाप कुतूहल होते. ते कुतूहल शमवण्यासाठी तो लेखकांच्या खनपटीला बसला. लेखकांनी थट्टा करीत करीत त्याची बोळवण केली.
(इ) प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ स्वतंत्र असते, याबाबत तुमचा विचार स्पष्ट करा.
उत्तर: प्रत्येकाची विचार करण्याची सवय व वेळ स्वतंत्र असते, यात शंकाच नाही. कोणाला कोणत्या वेळेला नवनवीन विचार सुचतील किंवा नवनवीन कल्पना स्फुरतील, हे सांगता येणे तसे कठीणच आहे. आमच्या कॉलनीत एक कवी राहतो. त्याला कॉलनीमध्ये चांगला मान आहे. अनेक जण त्याच्याकडून वेगवेगळ्या प्रसंगांसाठी कविता लिहून घेतात. तोसुद्धा अतिशय आनंदाने लिहून देतो. या आमच्या कार्टून कॉलनीच्या टोकाला एक रस्ता आहे. तो रस्ता तिथेच संपतो. त्यामुळे तेथे वर्दळ नसते. हा कवी रोज सकाळी तिथे येरझारा घालत फिरत राहतो. असे चालता चालता त्याला कवितेच्या ओळी सुचतात. माझ्या वर्गात माझा एक मित्र आहे. तो अभ्यास करताना मोबाईलवर चित्रपट गीते लावून ठेवतो. त्याच्या मते, गाणी चालू असताना उत्तरे सुचतात, निबंध चांगला लिहिता येतो, गणित सहज सोडवता येतात. तो सांगतो की, गाणी चालू असताना त्याचे मन एकाग्र होते. ‘काळे केस’ या पाठाचे लेखक ना. सी. फडके यांना दाढी करता करता लेखन सुचत असे.
या बाबतीत काही नियम सांगता येणे केवळ अशक्य आहे. प्रत्येकाची सवय वेगळी असते. स्वतःचे मन मुक्त आणि आनंदी होण्याची वेळसुद्धा वेगवेगळी असते. मन मुक्त आणि आनंदी असते तेव्हा विचार सुचतात, कल्पना सुचते. मनाची ही अवस्था कोणाला कधी लाभेल हे काहीही सांगता येत नाही.
भाषाभ्यास
तत्पुरुष समास
खालील तत्पुरुष समासातील सामासिक शब्दांच्या विग्रहाचा अभ्यास करून त्यांतील विभक्ती ओळखा.

उत्तर:
सामासिक शब्द | विग्रह | विभक्ती |
---|---|---|
(अ) सभागृह | सभेसाठी गृह | चतुर्थी |
(आ) कलाकुशल | कलेत कुशल | सप्तमी |
(इ) ग्रंथालय | ग्रंथांचे आलय | षष्ठी |
(ई) कष्टसाध्य | कष्टाने साध्य | तृतीया |
(उ) रोगमुक्त | रोगापासून मुक्त | पंचमी |
विभक्ती तत्पुरुष समासाची वैशिष्ट्ये-
(अ) समासातील पहिले पद नाम किंवा विशेषण असते.
(आ) विग्रह करताना प्रथमा व संबोधन सोडून अन्य विभक्ती लागते.
ज्या तत्पुरुष समासात कोणत्यातरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात, त्यास ‘विभक्ती तत्पुरुष समास’ म्हणतात.
खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दांचा विग्रह करा.

उत्तर:
(अ) सूर्यप्रकाश – सूर्याचा प्रकाश
(आ) देशार्पण – देशाला अर्पण
(इ) ऋणमुक्त – ऋणापासून मुक्त
(ई) तोंडपाठ – तोंडाने पाठ