Maharashtra State Board Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 13 कर्ते सुधारक कर्वे

By Admin

Updated on:

Advertisement

Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 13 Questions and Answers

In this article, you will find the Maharashtra State Board Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 13 कर्ते सुधारक कर्वे that will help you solve the exercise and understand the concepts.

Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 13 कर्ते सुधारक कर्वे

प्रश्न 1) खालील आकृत्या पूर्ण करा.

उत्तर:

महर्षी कर्वे यांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्य प्रकार :

  1. राष्ट्रीय स्वातंत्र्य
  2. संपूर्ण स्वातंत्र्य

उत्तर:

महर्षी कर्वे यांचे स्त्री-स्वातंत्र्याबद्दलचे विचार :

  1. स्त्रियांना गुलामीतून मुक्त करायचे असेल तर देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे.
  2. आपण गुलाम आहोत याचे स्त्रीला भान आले पाहिजे.
  3. स्त्री शिक्षण घेतलेच पाहिजे.
  4. शांतपणे, सोशीकपणे व सहिष्णू वृत्ती स्त्री-शिक्षणाची चळवळ केली पाहिजे.

उत्तर:

महर्षी कर्वे यांची प्रेरणास्थाने :

  1. पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र
  2. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवन कार्य

उत्तर:

महर्षी कर्वे यांची स्त्रियांबाबतची स्वप्ने :

  1. स्त्री स्वाभिमानी बनली पाहिजे.
  2. उच्चविद्याविभूषित केली पाहिजे.
  3. स्त्रीला पुरुषाइतकेच स्वातंत्र्य मिळाले पाहिजे.
  4. स्त्री शिकली पाहिजे.

प्रश्न 2) महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा ओघतक्ता तयार करा.

उत्तर:

कार्यात नेमकेपणा होता.
ते बोलत नसत.
विचार करीत असत.
विचार पक्का झाला की
तो विचार आचरणात आणत.
लोकांना त्यांच्या कृतीतून त्यांचा विचार समजत असे.

प्रश्न 3) हे केव्हा घडेल ते लिहा.

(अ) कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल _______

(आ) स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल _______

उत्तर:

(अ) कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल, जेव्हा पुरुषांचेही ‘शिक्षण’ होईल.

(आ) स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल, जेव्हा ती उच्चविद्याविभूषित होईल.

प्रश्न 4) चौकटी पूर्ण करा.

(अ) लेखकांच्या मते दुसऱ्याच्या दु:खात दु:खी व सुखात सुखी होणारा –

(आ) कर्वेयांना लोकमानसाने दिलेली पदवी –

उत्तर:

(अ) लेखकांच्या मते दुसऱ्याच्या दु:खात दु:खी व सुखात सुखी होणारा – स्थितप्रज्ञ

(आ) कर्वेयांना लोकमानसाने दिलेली पदवी – महर्षी

प्रश्न 5) पाठाच्या आधारे वाक्यांचा उर्वरित भाग लिहून वाक्ये पूर्ण करा.

(अ) स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे –

(आ) समाजाविरूद्ध विद्रोह केला तर –

(इ) लोकांनी कर्वे यांची ससेहोलपट चालवली तरी –

उत्तर:

(अ) स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे आहे.

(आ) समाजाविरुद्ध विद्रोह केला तर विद्रोह करणाऱ्याला समाज गिळून टाकायला येईल.

(इ) लोकांनी कर्वे यांची ससेहोलपट चालवली तरी कर्त्यांनी त्यांना शिव्याशाप दिले नाहीत किंवा आपल्या कार्यापासून कर्वे विचलित झाले नाहीत.

प्रश्न 6) ‘कार्य’ या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे शोधा.

उत्तर:

कार्य या नामाची विशेषणे : मोठे, अतोनात, कठीण, ऐतिहासिक, जटिल, अटीतटीचे, महाकठीण, अलौकिक, महान इत्यादी.

प्रश्न 7) खालील वाक्यांतील वाक्प्रचार शोधा.

(अ) शिक्षकांनी सांगितलेली हृदय आठवण आमच्या मनात घर करून राहिली.

(आ) वक्त्याचे विचार अनेकांच्या पचनी पडले नाहीत.

उत्तर:

(अ) मनात घर करून राहणे.

(आ) पचनी न पडणे.

प्रश्न 8) खालील वाक्यांतील उभयान्वयी अव्यये शोधून लिहा.

(अ) त्याने लाडू व करंज्या खाल्ल्या.

(आ) पाऊस आला आणि गारा पडल्या.

(इ) तो येणार, कारण त्याला पैशांची गरज आहे.

(ई) आजी म्हणाली, की मी उद्या गावाला जाणार आहे.

उत्तर: उभयान्वयी अव्यय

(अ)

(आ) आणि

(इ) कारण

(ई) की

प्रश्न 9) केवलप्रयोगी अव्ययांचा वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.

उत्तर:

(अ) ओहो! काय सुंदर देखावा आहे हा!

(आ) अरेरे! असा प्रसंग वैऱ्यावर देखील येऊ नये.

(इ) छे! तुझी कल्पनाच मुळी मला पसंत नाही.

(ई) वाहव्वा! आज तू फार चांगला खेळलास.

प्रश्न 10) स्वमत.

(अ) ‘स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे’, या विधानामागील अण्णांचा दृष्टिकोन स्पष्ट करा.

उत्तर: समाजात स्त्रियांची संख्या पुरुषांइतकीच असते. थोडी कमी-जास्त भरेल. पण साधारणपणे स्त्रिया म्हणजे समाजाचा अर्धा भाग होय. दुर्दैवाने आपल्या समाजाने स्त्रियांना मागासलेले ठेवले. त्यामुळे अर्धा समाज मागासलेला राहिला. त्याचे अनंत तोटे समाजाला आजसुद्धा भोगावे लागत आहेत. बहुतेक वेळा हे नुकसान मोजता येत नाही. मोजता न आल्यामुळे आपले किती नुकसान झालेले आहे, हे कळतही नाही. स्त्रियांना मागासलेले ठेवल्यामुळे समाजाची अर्धी बुद्धिमत्ता निरुपयोगी राहते. त्या बुद्धीचा समाजाला उपयोग झाला असता, पण ती वाया जाते. पुरुष बहुतांश वेळा स्वार्थी व आत्मकेंद्री असतो. स्त्री अधिक सामाजिक असते. यामुळे कुटुंबातला पुरुष शिकला तर कुटुंबातील एका व्यक्तीचा विकास होतो. मात्र स्त्री शिकली तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. अखंड कुटुंब शिक्षित होते. आपण हे ओळखले पाहिजे. स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीचे स्थान दिले पाहिजे.

(आ) ‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ हे वचन महर्षी कर्वेयांच्या जीवनाला कसे लागू पडते, ते स्पष्ट करा.

उत्तर: अण्णासाहेबांनी फार मोठे स्वप्न पाहिले होते. ते फार मोठी झेप घेऊ पाहत होते. त्यांच्या स्वप्नाला संपूर्ण समाजाची साथ मिळाली नाही. समाजाने अण्णासाहेबांना ओळखलेच नाही. समाजाने साथ दिली नाहीच; उलट पराकोटीचा विरोध केला. त्यांचा सतत अपमान केला. त्यांना धक्काबुक्की केली. त्यांचे कपडे फाडले. हे रोज घडत होते. त्यामुळे स्वत:चे कपडे रोज रोज शिवण्याची पाळी त्यांच्यावर येई. स्त्री-शिक्षणासाठी देणग्या गोळा केल्या तर भ्रष्टाचाराचा सतत धाक दाखवला जाई. त्यांच्या चळवळीमुळे कुटुंबीयांनाही त्रास सहन करावा लागे. त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यातही आला होता. हे सर्व यातनामय होते. लोककल्याणासाठी अण्णासाहेबांनी या यातना सहन केल्या. आज आपण अण्णासाहेबांची स्मारके उभारतो. परंतु प्रत्यक्ष जीवनात त्यांना दुःख, कष्ट आणि यातनाच सहन कराव्या लागल्या. ‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ हे तुकाराम महाराजांचे वचन अण्णासाहेबांना तंतोतंत लागू पडते.

(इ) ‘कर्ते सुधारक कर्वे’ या पाठातून महर्षी अण्णा कर्वेयांचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण, तुमच्या शब्दांत सांगा.

उत्तर: अण्णासाहेब कर्वे यांचे फार मोठे वेगळेपण या पाठातून वाचकांसमोर येते. बऱ्याच वेळा सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना स्वतःच्या सामाजिक कार्याचा गर्व असतो. ती माणसे या गर्वामुळे आक्रमक बनतात. अण्णासाहेबांची प्रकृती याबाबतीत नेमकी उलटी होती. त्यांना प्रचंड आत्मविश्वास होता. पण गर्व नव्हता. ते कधीच आक्रमक बनले नाहीत. उलट ते शांतपणे, कोणावरही न रागावता, आक्रस्ताळेपणा न करता आपले काम करीत. त्यांचे अपमान झाले. अडवणूक झाली. त्यांच्यावर हल्ले झाले. जाता-येता त्यांचे कपडे फाडले गेले. पण ते विचलित झाले नाहीत. घाबरले नाहीत किंवा दुःखी-कष्टीही झाले नाहीत. ते स्थितप्रज्ञाप्रमाणे शांत राहिले. नव्हे ते स्थितप्रज्ञच होते. हा त्यांचा गुण, त्यांचा वेगळेपणा मला खूप भावला आहे. खूप आवडला आहे.

Advertisement

Leave a Comment