Maharashtra State Board Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 12 भरतवाक्य (कविता)

Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 12 Questions and Answers

In this article, you will find the Maharashtra State Board Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 12 भरतवाक्य (कविता) that will help you solve the exercise and understand the concepts.

Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 12 भरतवाक्य (कविता)

प्रश्न 1) आकृती पूर्ण करा.

Advertisements

उत्तर:

चारित्रसंपन्न बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी :

  1. सुसंगतीत राहावे
  2. सुविचार ऐकावे
  3. बुद्धीचा कलंक झडावा

चारित्रसंपन्न बनण्यासाठी टाळल्या पाहिजेत अशा गोष्टी :

  1. विषयवासना नको
  2. दुरभिमान नसावा
  3. निश्चय ढळू नये

उत्तर:

मन वाईट गोष्टींकडे वळू नये म्हणून करायच्या गोष्टी :

  1. मन भवच्चरित्रावर (परमार्थावर) जडवावे.
  2. मनातील निश्चय ढळू देऊ नये.
  3. भजन करताना विचलित मन होऊ नये.
  4. मन मलीन होऊ देऊ नये.

प्रश्न 2) योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा.

(अ) कवींच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून ______

  1. सतत परमेश्वराच्या सान्निध्यात राहावे.
  2. सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे.
  3. सतत आत्मबोध घ्यावा.
  4. चारधाम यात्रा करावी.

उत्तर: कवींच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे.

(आ) सदंघ्रिकमळीं दडो; म्हणजे ______

  1. कमळाच्या फुलात चित्त सदैव गुंतो.
  2. कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनांच्या पायाशी मन गुंतो.
  3. कमळाच्या व भ्रमराच्या सौंदर्यात मन गुंतो.
  4. कमळात मन लपून राहो.

उत्तर: सदंघ्रिकमळीं दडो; म्हणजे कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनांच्या पायाशी मन गुंतो.

प्रश्न 3) खालील गोष्टींच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात ते लिहा.

उत्तर:

गोष्टीविनंती
1) निश्चयकधीही ढळू नये.
2) चित्तभजन करताना विचलित होऊ नये.
3) दुरभिमानसर्व गळून जावा.
4) मनमलीन होऊ नये.

प्रश्न 4) खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

(1) मति सदुक्तमार्गीं वळो

उत्तर: कुमार्ग सोडून चांगल्या मार्गावर बुद्धी वळवावी, म्हणजेच सत्कार्य करावे.

(2) न निश्चय कधीं ढळो

उत्तर: दृढ केलेला निर्धार कधीही विचलित होऊ नये.

प्रश्न 5) काव्यसौंदर्य.

(अ) ‘सुसंगती सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो;’ या ओळींचे रसग्रहण करा.

उत्तर:

आशयसौंदर्य : ‘केकावली’ या काव्य ग्रंथ के समाप्ती करताना उपसंहार म्हणून ही ‘भरतवाक्य’ काव्यरचना कविश्रेष्ठ मोरोपंतांनी लिहिली आहे. तनामनातील दुर्गुण जाऊन सद्गुण कोणते व कसे अंगिकारावे, याबद्दल देवाकडे आर्त प्रार्थना केली आहे.

काव्यसौंदर्य : ‘सुसंगती’ म्हणजे चांगल्या, सज्जन व्यक्तीची मैत्री होय, गुणवान व चारित्र्यवान माणसांच्या संगतीत सदैव राहावे, म्हणजे आपली आत्मिक प्रगती व ज्ञानप्राप्ती होते, असा आशय उपरोक्त ओळींमध्ये व्यक्त झाला आहे. ‘सुजनवाक्य’ म्हणजे सुविचारांची धारणा जर केली, तर मन निर्मळ व प्रेमळ होते. असाही सुयोग्य सल्ला मोरोपंतांनी जनसामान्यांना दिला आहे.

भाषिक वैशिष्ट्ये : प्रस्तुत ओळींमध्ये सामान्य माणसांना परमार्थाची आवड लागावी, म्हणून दोन वर्तन-नियम सांगितले आहेत. साधकाने चारित्र्यसंपन्न होण्यासाठी उपदेश केला आहे. प्रत्येक चरणात ११+१३ मात्रेची आवर्तने असणारी हे ‘केकावली’ नावाचे मात्रावृत्त आहे. यातील भाषा साधी, सोपी व आवाहक असल्यामुळे हृदयाला थेट भिडणारी आहे. ‘घडो-जडो’ या यमक प्रधान क्रिया पदांमुळे कवितेला सुंदर लय व नाद आला आहे.

(आ) ‘स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.

उत्तर: माणसाने चारित्र्यसंपन्न होण्यासाठी स्वत:मधील स्वतत्त्व मनोमन ओळखावे. आत्मविश्वास वाढवावा, गर्विष्ठपणा त्याग करावा. दुरभिमान अजिबात बाळगू नये. आपले मन वाईट विचारांनी मलीन, भ्रष्ट करू नये. मन शुद्ध करावे. आत्मज्ञान वाढवावे. आत्मज्ञान मध्ये सर्व अनिष्ट गोष्टी जाळून टाकाव्यात.

(इ) सत्प्रवृत्त व्यक्तीची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर: सत्प्रवृत्ती व्यक्ती म्हणजे सज्जन व्यक्ती. ही मनाने अतिशय निर्मळ असते. सर्व प्राणिमात्रांबद्दल तिच्या मनात नितांत प्रेमभाव वसत असतो. कुविचारांना त्यांच्या मनात जराही थारा नसतो. त्यांचे हृदय करुणेने ओतप्रोत भरलेले असते. काम, क्रोध, मद, मत्सर, आलस्य व मोह या षड्विकारांवर त्यांनी मात केलेली असते. ते सदैव परोपकारी असतात. दुसऱ्यांच्या दुःखाने व्यथित होणारे त्यांचे मन सतत तळमळत राहते. त्यांच्या हातून सदैव सत्कार्य घडते. त्यांच्या हृदयात दया, क्षमा, शांती वसत असते. सत्प्रवृत्त व्यक्ती अंतर्बाह्य पारदर्शक असते. म्हणून सज्जनांचा सहवास असावा व त्यांच्या सद्विचारांचे श्रवण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

(ई) वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ते लिहा.

उत्तर: सर्वप्रथम चांगल्या गोष्टी व वाईट गोष्टी कोणत्या यांची निवड विवेकबुद्धीने करावी. त्यानंतर वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी मन खंबीर करावे. बुद्धी स्थिर ठेवावी. चंचलता सोडून दयावी. चांगल्या मित्रांच्या संगतीत नेहमी राहावे. त्यांचा योग्य तो सल्ला घ्यावा. थोरामोठ्यांचा आदर करावा. त्यांचे अनुभवाचे बोल ग्रहण करावेत. चांगल्या संस्कारमय पुस्तकांचे वाचन करावे. सद्विचाराने वर्तन करावे. दुसऱ्यांचे मन जाणून घ्यावे. शक्यतो परोपकार करावा. आपल्या वागण्याने कुणीही दुखावणार नाही याची काळजी घ्यावी. प्रेममय हृदय धारण करावे. जनात आपण प्रिय ठरू असे वर्तन करावे.

Leave a Comment