Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 10.1 Questions and Answers
In this article, you will find the Maharashtra State Board Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 10.1 मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) that will help you solving the exercise and understanding the concepts.
Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 10.1 मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन)
प्रश्न 1) खालील संकल्पनांमधील सहसंबंध स्पष्ट करा.

उत्तर:
‘बी’चे झाड होणे
- (१) बीच
- (२) माती
- (३) झाड होते
माणसाचे माणूसपण जागे होणे
- (१) माणूस
- (२) प्रगल्भता
- (३) माणुसकी
प्रश्न 2) ‘माणसं पेरायला लागू’ या शीर्षकातून कवीला अभिप्रेत असलेला भावार्थ उलगडून दाखवा.
उत्तर: कवी वीरा राठोड यांनी ‘मनक्या पेरेन लागा’ या कवितेत “बीज” व ‘माती’ यांचा जिव्हाळ्याचा स्नेहभाव व्यक्त करताना माणसे पेरण्याचा बहुमोल सल्ला दिला आहे.
त्यांनी माती व बीज यांच्या प्रतीकांतून एक सुंदर विचार मांडला आहे. एका चिमुकल्या बीजातून झाड होईपर्यंतचा प्रवास माती ममतेने जोपासते. बीजाचे झाड करण्यात तिच्या जन्माचे सार्थक आहे. त्याप्रमाणे या समाजाच्या मातीत माणसे रुजवली व त्यांच्यावर चांगले संस्कार केले तर त्यातून चिरंतन माणुसकी निर्माण होईल, हा आशय या कवितेतून अभिव्यक्त होतो. म्हणून ‘माणसं पेरायला लागू’ हे शीर्षक अतिशय समर्पक ठरते.
प्रश्न 3) ‘माणसे पेरा । माणुसकी उगवेल’ या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
उत्तर: मातीत बीज पेरलं की, मातीच्या कष्टमय मायेतून त्याचे झाड होते. माती त्या बीजाला सगळ्या नैसर्गिक आपत्तींपासून वाचवते. दुष्काळाशी लढते. बीजाची मायेने निगराणी करते. या सर्व प्रक्रियेतून बीजाचा वृक्ष होतो. त्याप्रमाणेच आजच्या मूल्यहीन समाजामध्ये चांगल्या संस्काराच्या मातीत जर माणसांना पेरले, तर त्यातून मानवतेचा निकोप वृक्ष उभा राहील, अशी आशादायक भावना या विधानातून व्यक्त झाली आहे. नवविचारांच्या नवसमाजात माणुसकीला बहर येईल व मानवजात सुखी होईल, असा सर्जनशील आशय ‘माणूस पेरा! माणुसकी उगवेल!’ या विधानातून व्यक्त होतो.
प्रश्न 4) ‘माणुसकी पेरणे काळाची गरज’ या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
मातीमध्ये बी पेरले की, मातीच्या मायेच्या संस्कारांमधून वृक्ष जन्माला येतो. माती ऊन-वारा-पाऊस-वादळाची झळ सोसून बीजाची जोपासना करते. बीजाला दुष्काळाची झळ सोसावी लागू नये; म्हणून ती दुष्काळाशी सामना करते. या प्रतीकांतून कवीनं सामाजिक आशय मांडला आहे. आज भ्रष्टाचार, दैन्य, अंधश्रद्धा व इतर धर्मांध घटक यांमुळे समाज पोखरलेला आहे व त्यात माणुसकी लयाला जात आहे. अशा या आधुनिक काळात माणसांवर चांगले संस्कार होऊन माणुसकी निर्माण होणे आवश्यक आहे. म्हणून माणुसकी पेरणे म्हणजेच विवेकी माणूस निर्माण करण्याची आजच्या काळाची गरज अधोरेखित होते.