Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 1 तू बुद्धी दे

Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 1 Questions and Answers

We have provided Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 1 तू बुद्धी दे that will help you solve the exercise and understand the concepts. Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 1 will help students complete their assignments and homework on time while supporting them in their board exam preparation. It will also help the students understand the concepts better.

Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 1 PDF तू बुद्धी दे

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ –

Advertisements
  1. आभाळ हरवणे – निराधार होणे, मायेची सावली नसणे – to become shelterless, to be orphaned.
  2. खल भेदणे – दुष्टांचा नायनाट करणे – to destroy evil, to drive away wickedness.
  3. पंखास बळ देणे – झेप घेण्याची शक्ती देणे, आधार मिळणे – to give strength to soar, to provide vigour and courage to conquer.

कवितेचा भावार्थ –

तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे

जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे

कवी ईश्वराची आळवणी करताना म्हणतात हे देवा, तू मला – बुद्धी दे. प्रकाश दाखव. नवीन स्फूर्ती दे. विश्वास दे. जगात जे जे सत्य व सुंदर आहे. त्या गोष्टींची मला जन्मभर ओढ असू दे.

हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती,

सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी

साधना करिती तुझी जे नित्य तव सहवास दे

ज्यांना घरदार नाही. जे निराधार आहेत, अनाथ आहेत, त्यांचा तू सोबती हो. ज्यांना जीवनमार्ग (सन्मार्ग) सापडलेला नाही, जे भरकटलेले आहेत, त्यांचा तू मार्गदर्शक (सारथी) हो. जे तुझी मनापासून भक्ती करतात, त्यांना तुझा नेहमी सहवास घडू दे; त्यांच्या पाठीशी उभा राहा.

जाणावया दुर्बलांचे दुःख आणि वेदना

तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना

धमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे

सामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे

पीडित, दुबळ्या, गोरगरीब लोकांच्या वेदना आणि दुःख जाणून घ्यायची संवेदना नेहमी माझ्या रक्तामध्ये उजळत, तेवत राहो. माझ्या नसांतून वाहणाऱ्या रक्ताला दुष्टदुर्जनांचा नाश करण्याची प्रेरणा दे. माझ्या शब्दांना अफाट शक्ती आणि माझ्या जीवनाला अर्थ दे.

सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती

नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती

पंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे

सन्मार्ग, सन्मती (सद्विवेक), सज्जनांची संगत मला सदैव मिळो. कितीही संकटे आली तरी सदाचारापासून मला दूर करू नकोस. माझी वागणूक भ्रष्ट होऊ नये. कर्तृत्वाच्या आकाशात भरारी घेण्यासाठी माझ्या पंखात बळ (मानसिक शक्ती) दे.

Leave a Comment