IARI Recruitment 2022: भारतीय कृषी संशोधन संस्थेत 641 जागांसाठी भरती, दहावी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी

IARI Recruitment

IARI Recruitment 2022: Apply Online for 641 Technician Posts @iari.res.in

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) ने टेक्निशियन (T-1) पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. यासंदर्भातील नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. एकूण 641 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार आता IARI तंत्रज्ञ भरती 2022 (IARI Technician Recruitment 2022)साठी iari.res.in या अधिकृत वेबसाइटवर 20 जानेवारी 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

आयसीएआरनं जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार एकूण 641 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये 286 खुला प्रवर्ग, ओबीसी 133, ईडब्ल्यूएस 61 आणि एससी साठी 93, एसटी साठी 68 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. आयसीएआरनं या जागांमध्ये बदल केला जाऊ शकतो, असं कळवलं आहे.

 • संघटनेचे नाव: भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI)
 • जाहिरात क्र.: 1-1/2021/Rectt. Cell/Technical (CBT)
 • पदाचे नाव: टेक्निशियन (T-1)
 • पदांची संख्या: 641 जागा
 • वेतन: मूळ जाहिरात बघा.
 • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा:

 • 18 ते 30 वर्षे
 • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी:

 • General/OBC/EWS: रु1000/-  
 • SC/ST/ExSM/PWD/महिला: रु300/-

परीक्षा (CBT): 25 जानेवारी ते 05 फेब्रुवारी 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2022 (मुदतवाढ)

जाहिरात (Notification): Download

अधिकृत वेबसाईट: Website

ऑनलाईन अर्ज करा: Apply Online

या प्रकारे करा अर्ज

 • उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट iari.res.in ला भेट द्यावी.
 • आता Recruitment Cell या टॅबवर क्लिक करा.
 • टेक्निशियन (T-1) च्या ऍप्लिकेशन विंडोवर क्लिक करा.
 • अर्ज करण्यापूर्वी वेबसाइटवर दिलेली सूचना वाचा.
 • अर्ज भरण्यासाठी आता नोंदणी करा.
 • नोंदणी केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
 • फी भरा आणि अर्जाचा फॉर्म नीट तपासा.
 • आता तुमचा अर्ज सबमिट करा.
 • अर्ज डाउनलोड करा आणि त्याचा प्रिंट काढा.

सूचना: अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात बघा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here