Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी – 28 डिसेंबर 2022

Marathi Current Affairs 28 December 2022

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 28 डिसेंबर 2022 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharati, and Govt Exams.

Advertisements

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट को/कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.co येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

Daily Marathi Current Affairs | 28 December 2022

1) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणत्या राज्यात सशस्त्र सैन्यसाठी आधुनिक मल्टी स्पेशालिटी कमांड हॉस्पिटल बांधण्यास मंजुरी दिली ?

उत्तर : उत्तरप्रदेश

2) भारत सरकारने भारताचे पहिले मानवयुक्त अंतराळ अभियान ‘गगणयान’ कोणत्या वर्षात लाँच करण्याची निर्धारित केले आहे?

उत्तर : 2024

3) फिफा जागतिक क्रमवारी 2022 मध्ये खालीलपैकी कोणता देश अव्वल स्थानी आहे?

उत्तर : ब्राझील

4) पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने कोणत्या शहरात ‘डान्स टू डेकार्बोनाइज’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले होते?

उत्तर : नवी दिल्ली

5) कोणते राज्य भारतातील पहिल्या जागतिक टेबल टेनिस (WTT) मालिकेचे आयोजन करणार आहे ?

उत्तर : गोवा

6) 15 वा हॉकी विश्वचषक भारतामध्ये ओडिशा या ठिकाणी 13 जानेवारी ते 29 जानेवारी 2023 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी भारताच्या संघाचे कर्णधारपद कोणाकडे सोपवण्यात आले आहे?

उत्तर : हरमनप्रीत सिंग

7) फोर्ब्स या मॅगझिनने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या 2022 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंची यादीमध्ये भारताची पी. व्ही. सिंधु कितव्या क्रमांकावर आहे.

उत्तर : 12 व्या

8) पुष्प कमल दहल (प्रचंड) नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत?

उत्तर : नेपाल

9) सध्या चर्चेत असलेल्या ‘उजव्या सोंडेचा बाहुल्या’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

उत्तर : प्रवीण दशरथ बांदेकर

10) रेल्वे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर : अनिल कुमार लाहोटी

Previous articleMarathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी – 26 डिसेंबर 2022
Next articleआजचा नवीन प्रश्नसंच – पोलीस भरती संभाव्य प्रश्नसंच 7 : भूगोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here