Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी – 24 डिसेंबर 2022

Marathi Current Affairs 24 December 2022

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 24 डिसेंबर 2022 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharati, and Govt Exams.

Advertisements

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट को/कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.co येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

Daily Marathi Current Affairs | 24 December 2022

1) मराठी भाषेतील ‘साहित्य अकादमी पुरस्कार 2022’ कोणाला जाहीर झाला आहे?

उत्तर : प्रवीण बांदेकर

2) ‘वस्तू आणि सेवा कर’च्या 48 व्या (GST)’ परिषद बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे?

उत्तर : निर्मला सीतारमण

3) इंग्रजी भाषेतील ‘साहित्य अकादमी पुरस्कार 2022’ कोणाला जाहीर झाला आहे?

उत्तर : अनुराधा रॉय

4) ग्रामीण विकासातील उत्कृष्ट योगदानाबद्दल प्रथम रोहिणी नय्यर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?

उत्तर : सेथरिचम संगतम

5) युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (United World Wrestling) या संस्थेने 36 वी आशियाई कुस्ती चॅम्पियनशीप 2023 चे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणीकरण्याची घोषणा नुकतीच केली आहे.

उत्तर : भारत (नवी दिल्ली)

6) संयुक्त राष्ट्र संघटनेकडून खालीलपैकी कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे.

उत्तर : 2023

7) वैज्ञानिक प्रत्रकांच्या प्रकाशनामध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर राहीला आहे.

उत्तर : तिसऱ्या

8) नुकतेच निधन  झालेले पद्मश्री पुरस्कारप्राप्त  एचआर केशव मूर्ती हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

उत्तर : गायक

9) 13 व्या WTO मंत्रीस्तरीय बैठकीचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?

उत्तर : संयुक्त अरब अमिराती (फेब्रुवारी 2024)

10) हिंदी भाषेतील ‘साहित्य अकादमी पुरस्कार 2022’ कोणाला जाहीर झाला आहे?

उत्तर : बद्री नारायण

Previous articleMaharashtra State Board 7th std Books PDF: All Subjects 2022-23
Next articleMaharashtra State Board 4th std Books PDF: All Subjects Updated for 2022-23

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here